ETV Bharat / sports

Kidambi Srikanth Interview : स्वतःवर विश्वास ठेवा आणि शेवटपर्यंत लढा - थॉमस कप विजेत्या श्रीकांतचा सल्ला

भारतीय संघाने 14 वेळच्या चॅम्पियन इंडोनेशियाचा पराभव करत थॉमस कप 2022 चे विजेतेपद पटकावले. किदाम्बी श्रीकांत ( Kidambi Srikanth ), जो त्याच्या विजेतेपदाच्या प्रवासाचा नायक होता, तो सहा वेळा कोर्टात उतरला आणि कोणताही विरोधक त्याला पराभूत करू शकला नाही. श्रीकांतने ईटीव्ही इंडियाशी एका खास संवादात आपले अनुभव शेअर केले. यादरम्यान त्यांनी तरुणांना सल्ला देत सांगितले की, भारताने जे इतिहास घडवले, ते भारतीय बॅडमिंटनमध्ये यापूर्वी कधीही पाहिले नव्हते.

Kidambi Srikanth
Kidambi Srikanth
author img

By

Published : May 27, 2022, 6:29 PM IST

हैदराबाद: पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती राम नाथ कोविंद, स्टार क्रिकेटर, सेलिब्रिटी आणि राजकारणी लोकांनी भारतीय बॅडमिंटन संघाचे कौतुक ( Appreciation of the Indian Badminton Team ) करत होते. कारण ही तसेच होते. टीम इंडियाने एकतर्फी सामन्यात इंडोनेशियाचा म्हणजेच 14 वेळा चॅम्पियनचा पराभव केला. थॉमस कप 2022 ची ट्रॉफी 3-0 ने जिंकून तिरंग्याचा गौरव केला. त्यानंतर आता किदाम्बी श्रीकांतने ( Kidambi Srikanth Interview ) ईटीव्ही भारतशी संवाद साधला आहे.

या संघात पाच वीर होते, ज्यांची नाव किदाम्बी श्रीकांत, एचएस प्रणॉय, लक्ष्य सेन, सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी. या सर्वांनी प्रथमच थॉमस कप भारतात आणून इतिहासात आपले नाव नोंदवले. किदाम्बी श्रीकांतचे जेवढे कौतुक होईल तेवढे कमीच होईल. माजी जागतिक नंबर वन शटलर भारतीय जेतेपदाच्या मोहिमेदरम्यान सहा वेळा कोर्टवर उतरला आणि कोणताही विरोधी खेळाडू अंगदला रोखू शकला नाही.त्यामुळे त्याने प्रत्येक सामन्यात विजय मिळवला.

ऐका किदाम्बी श्रीकांतशी ऑडिओद्वारे झालेल्या संभाषणातील काही भाग -

थॉमस कप विजेत्या श्रीकांतची मुलाखत

शटलर श्रीकांत म्हणाला, मी सांगू शकेल, असे काही विशेष नव्हते. कारण सगळेच छान खेळत होते. त्यामुळे मला एवढेच म्हणायचे आहे की शेवटपर्यंत लढायचे आणि मग एक संघ म्हणून खेळायचे आहे. एकमेकांना साथ देत राहायचे आहे. तसेच स्वतःवर विश्वास ठेवा की आपण ते करू शकतो (Believe in yourself fight till end ) आणि सामना संपेपर्यंत सकारात्मक राहणे महत्त्वाचे आहे. प्रत्येकजण चांगला खेळत होता, त्यामुळे मला फार काही सांगण्याची गरज नव्हती.

किदाम्बी म्हणाला, मला इतका विचार करण्याची गरज नव्हती. कारण मी खेळत होतो आणि तो खरोखर जवळचा सामना होता. आमच्याकडे खूप वेळ होता. मी फक्त एक विचार करत होतो, की मला जिंकायचे आहे.

हेही वाचा - Dinesh Karthik Statement : बाबर आझम तिन्ही फॉरमॅटमध्ये जगातील नंबर 1 खेळाडू बनू शकतो - दिनेश कार्तिक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.