ETV Bharat / sports

टोकियो पॅरालिम्पिकवीर जिल्हाधिकारी सुहास एलवाय यांच्या बॅडमिंटन रॅकेटवर करोडो रूपयांची बोली - Suhas LY

गौतमबुद्ध नगरचे जिल्हाधिकारी सुहास एलवाय यांच्या बॅडमिंटन रॅकेटचा ई लिलाव केला जात आहे. या रॅकेटवर आतापर्यंत करोडो रूपयांची बोली लावण्यात आली आहे. दरम्यान, सुहास एलवाय यांनी टोकियो पॅरालिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकले आहे.

DM Suhas LY badminton cost reached crores in e auction
टोकियो पॅरालिम्पिकवीर जिल्हाधिकारी सुहास एलवाय यांच्या बॅडमिंटन रॅकेटवर करोडो रूपयांची बोली
author img

By

Published : Sep 18, 2021, 3:08 PM IST

नई दिल्ली/नोएडा - गौतमबुद्ध नगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सुहास एलवाय यांनी टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करताना इतिहास रचत देशाचे नाव उज्ज्वल केले. त्यांनी या स्पर्धेत रौप्य पदक जिंकले. आता त्यांनी ज्या बॅडमिंटन रॅकेटच्या साहाय्याने हे पदक जिंकले त्याचा ई लिलाव केला जात आहे. दरम्यान, हा लिलाव केंद्र सरकारकडून केला जात असून यावर आतापर्यंत करोडो रुपयांची बोली लागली आहे.

जिल्हाधिकारी सुहास एलवाय यांच्या रॅकेटवर आतापर्यंत चार बिल्डर्संनी बोली लावली आहे. शुक्रवारी (17 सप्टेंबर) सुरू झालेल्या या लिलावासाठी रॅकेटची बेस प्राइज 50 लाख इतकी ठेवण्यात आली आहे. आतापर्यंत ही बोली 10 करोड पर्यंत पोहोचली आहे. 7 ऑक्टोबरच्या सायंकाळी 5 वाजेपर्यंत यावर बोली लावता येणार आहे.

DM Suhas LY badminton cost reached crores in e auction
टोकियो पॅरालिम्पिकवीर जिल्हाधिकारी सुहास एलवाय यांच्या बॅडमिंटन रॅकेटवर करोडो रूपयांची बोली

सुहास एलवाय यांच्या रॅकेटचा लिलाव केंद्र सरकारची वेबसाइट पीएम मेमेंटोज यावर चालू आहे. दरम्यान, या ई लिलावातून मिळणारा पैसा नमामि गंगे या प्रोजेक्टसाठी दिला जाणार आहे.

पीएल मेमेंटोज या वेबसाईवर जिल्हाधिकारी सुहास एलवाय यांच्या बॅडमिंटन रॅकेटसह अन्य खेळाडूंच्या साहित्याचा देखील लिलाव केला जात आहे. हा लिलाव सांस्कृतीक मंत्रालयाकडून आयोजित करण्यात आला आहे.

हेही वाचा - संतप्त शोएब म्हणाला, ''न्यूझीलंडने पाकिस्तान क्रिकेटची हत्या केली''

हेही वाचा - न्यूझिलंडने पाकिस्तान दौरा रद्द केल्यानंतर इंग्लंड क्रिकेट बोर्डानेही सुरू केला दौऱ्याचा फेरविचार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.