नवी दिल्ली: भारताची अव्वल स्क्वॉशपटू दीपिका पल्लीकल कार्तिकने ( Squash player Deepika Pallikal Karthik ) ग्लासगो येथे सुरू असलेल्या WSF जागतिक दुहेरी स्पर्धेत महिला आणि मिश्र दुहेरीचे दोन्ही विजेतेपद पटकावले. दीपिकाने मिश्र दुहेरीचे विजेतेपद सौरव घोषालसह ( Sourav Ghoshal ) आणि दुहेरीत जोश्ना चिनप्पासह जिंकले. दीपिका ऑक्टोबर 2018 नंतरच्या पहिल्या स्पर्धात्मक स्पर्धेत खेळत आहे. मिश्र दुहेरीचे विजेतेपद मिळवण्यासाठी तिने घोषालसोबत जोडीने अॅड्रियन वॉलर आणि अॅलिसन वॉटर्स या इंग्लिश जोडीचा 11-6, 11-8 असा पराभव केला.
-
Introducing your new World Champions! 🏆
— World Squash (@WorldSquash) April 9, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Congratulations to 🇮🇳 @indiasquash's @SauravGhosal and @DipikaPallikal, who have won the mixed doubles world championship title after beating 🏴 Waller and Waters 2-0 (11-6, 11-8)!#squash #india #WSFDoubles #Glasgow2022 pic.twitter.com/k3x49mOeYm
">Introducing your new World Champions! 🏆
— World Squash (@WorldSquash) April 9, 2022
Congratulations to 🇮🇳 @indiasquash's @SauravGhosal and @DipikaPallikal, who have won the mixed doubles world championship title after beating 🏴 Waller and Waters 2-0 (11-6, 11-8)!#squash #india #WSFDoubles #Glasgow2022 pic.twitter.com/k3x49mOeYmIntroducing your new World Champions! 🏆
— World Squash (@WorldSquash) April 9, 2022
Congratulations to 🇮🇳 @indiasquash's @SauravGhosal and @DipikaPallikal, who have won the mixed doubles world championship title after beating 🏴 Waller and Waters 2-0 (11-6, 11-8)!#squash #india #WSFDoubles #Glasgow2022 pic.twitter.com/k3x49mOeYm
दीड तासानंतर, दीपिका आणि जोश्ना यांनी महिला दुहेरीचे विजेतेपद इंग्लंडच्या सारा जेन पेरी ( Sarah Jane Perry ) आणि वॉटर्सवर 11-9, 4-11, 11-8 ने जिंकले. तीस वर्षीय दीपिका म्हणाली, कोर्टवर परतल्यानंतर मी आनंदी आहे. परत येण्यासाठी खूप प्रशिक्षण घेतले. राष्ट्रकुल स्पर्धेसाठी ही चांगली तयारी आहे, जे मुख्य लक्ष्य आहे.

ऑक्टोबरमध्ये जुळ्या मुलांची आई बनलेली दीपिका म्हणाली, "येथील आणि राष्ट्रकुल खेळांमध्ये स्पर्धा जवळपास सारखीच असेल आणि आम्हाला आमच्या प्रतिस्पर्ध्यांबद्दलही माहिती आहे, जिथे आम्हाला सुधारण्याची गरज आहे."
हेही वाचा - Maharashtra Kesari : कोल्हापूरचा दुष्काळ संपवला; विजयानंतर पृथ्वीराज पाटीलची प्रतिक्रिया