ETV Bharat / sports

Delhi Capitals New Captain : दिल्ली कॅपिटल्सची मुख्य धुरा डेव्हिड वाॅर्नरच्या खांद्यावर; तर 'हा' भारतीय खेळाडू बनला उपकर्णधार - तर हा भारतीय खेळाडू बनला उपकर्णधार

आयपीएल 2023 चा लिलाव झाल्यानंतर नुकतेच त्याचे शेड्यूल जाहीर झाले होते. आयपीएल सुरू होण्यापूर्वी दिल्ली कॅपिटल्सने मोठी माहिती शेअर केली आहे. या संघाने ऑस्ट्रेलियाच्या तडफदार फलंदाजाला आपला नवा कर्णधार म्हणून घोषित केले आहे. तर एका भारतीय खेळाडूवरही मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

Delhi Capitals New Captain David Warner
दिल्ली कॅपिटल्सची मुख्य धुरा डेव्हिड वाॅर्नरच्या खांद्यावर; तर 'हा' भारतीय खेळाडू बनला उपकर्णधार
author img

By

Published : Feb 23, 2023, 5:35 PM IST

नवी दिल्ली : इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेचा 16वा हंगाम 31 मार्च 2023 पासून सुरू होत आहे. कर्णधारपदाबाबत दिल्ली कॅपिटल्ससमोर मोठा पेच निर्माण झाला होता. कारण भारताचा स्टार क्रिकेटपटू ऋषभ पंत हा दिल्लीची जबाबदारी सांभाळत होता. परंतु, त्याच्या अपघातामुळे दिल्ली कॅपिटल्समधील त्याची जागा रिक्त झाली होती. दिल्ली कॅपिटल्सच्या व्यवस्थापन समितीसमोर मोठी समस्या निर्माण झाली होती. मात्र, आता ती अडचण दूर झाली आहे. फ्रँचायझीने या स्पर्धेसाठी आपला नवा कर्णधार जाहीर केला आहे.

ऑस्ट्रेलियाचा फलंदाज डेव्हिड वॉर्नर कर्णधारपदी : ऋषभ पंतच्या अनुपस्थितीमुळे दिल्ली कॅपिटल्सने ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज डेव्हिड वार्नरला कॅप्टन बनवण्याचा निर्णय घेतला. पंतला पूर्णपणे सावरायला अजून वेळ लागणार आहे. यामुळे दिल्ली कॅपिटल्स संघ आपल्या कर्णधाराच्या शोधात होता. ऑस्ट्रेलियाचा फलंदाज डेव्हिड वॉर्नर आता दिल्ली कॅपिटल्सची जबाबदारी सांभाळणार आहे. यासोबतच टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल संघाचा उपकर्णधार असणार आहे.

दिल्ली कॅपिटल्सच्या मालकाने घेतला निर्णय : भारतीय संघातील तरुण खेळाडू ऋषभ पंत आपल्या संघात आता नसणार यामुळे दिल्ली कॅपिटल्सच्या मालकाने हा निर्णय घेतला. आयपीएल 2022 मध्ये ऋषभ पंतने टीम इंडियाचे नेतृत्व केले होते. त्यादरम्यान दिल्ली कॅपिटल्सने 5व्या क्रमांकावर राहून स्पर्धा संपवली. ज्यामध्ये दिल्ली कॅपिटल्सने 14 सामन्यांपैकी सुमारे 7 सामने जिंकले. याशिवाय 7 सामने हरले. आता IPL 2023 मध्ये दिल्ली कॅपिटल्सची कामगिरी कशी असेल. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

डेव्हिड वॉर्नरची आयपीएलमधील कामगिरी : ऑस्ट्रेलियन क्रिकेटर डेव्हिड वॉर्नर दीर्घकाळापासून आयपीएलमध्ये खेळत आहे. अशा परिस्थितीत डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वाखाली संघ अधिक चांगली कामगिरी करेल असा अंदाज वर्तवला जात आहे. ऑस्ट्रेलियन फलंदाज डेव्हिड वॉर्नरने 2009 मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. त्याने त्याच्या आयपीएल कारकिर्दीत आतापर्यंत एकूण 162 सामने खेळले आहेत. त्याने 42.01 च्या सरासरीने 5881 धावा केल्या आहेत.

दुखापतीमुळे डेव्हीड वाॅर्नरला कसोटी क्रिकेटमधून विश्रांती : ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज डेव्हिड वॉर्नर सध्या सुरू असलेल्या बॉर्डर-गावस्कर मालिकेतील पुढील दोन कसोटींमध्ये खेळू शकणार नाही. त्याच्या डाव्या हाताच्या कोपऱ्याला फ्रॅक्चर झाल्याने गंभीर दुखापत झाली आहे. ऑस्ट्रेलियाकडून फलंदाजी करताना मोहम्मद सिराजच्या चेंडूचा फटका हाताच्या कोपऱयाला जोरात बसला, तरीही तो खेळपट्टीवर खेळत होता. परंतु, या दुखापतीने तो 15 धावांची खेळी करू शकला. परत आल्यानंतर हाताचे स्कॅन केल्यानंतर हेअरलाइन फ्रॅक्चर झाल्याचे आढळून आले. त्याची रिकव्हरी होण्यासाठी वेळ लागणार असल्याचे डाॅक्टरांनी सांगितल्याने, त्याला परत सिडनीला जाणे भाग पडले आहे.

हेही वाचा : Sunrisers Hyderabad New Captain : सनरायझर्स हैदराबादच्या कर्णधारपदी एडन मार्करामची निवड; जाणून घ्या तडफदार फलंदाजाविषयी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.