ETV Bharat / sports

फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोवर कोसळला दु:खाचा डोंगर, नवजात मुलाचे निधन - मँचेस्टर युनायटेड

ख्रिस्तियानो रोनाल्डोने सोमवारी सोशल मीडियावर सांगितले की त्याच्या नवजात जुळ्या मुलांपैकी मुलाचा मृत्यू झाला आहे. आपल्या मुलाच्या मृत्यूमुळे रोनाल्डोला खूप दु:ख झाले आहे आणि त्याने लोकांना त्याच्या गोपनीयतेची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो
फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो
author img

By

Published : Apr 19, 2022, 12:50 PM IST

मँचेस्टर (इंग्लंड): प्रसिद्ध फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. 18 एप्रिलच्या रात्री त्याची जोडीदार जॉर्जिना रॉड्रिग्ज हिने दोन जुळ्या मुलांना जन्म दिला. यापैकी त्यांची नवजात मुलगी पूर्णपणे सुरक्षित असली तरी नवजात मुलाचा मृत्यू झाला आहे. आपल्या मुलाच्या मृत्यूमुळे रोनाल्डोला खूप दु:ख झाले आहे आणि त्याने लोकांना त्याच्या गोपनीयतेची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

ख्रिस्तियानो रोनाल्डोने सोमवारी सोशल मीडियावर सांगितले की त्याच्या नवजात जुळ्या मुलांपैकी मुलाचा मृत्यू झाला आहे. मँचेस्टर युनायटेड स्ट्रायकरने त्याची जोडीदार जॉर्जिना रॉड्रिग्जने स्वाक्षरी केलेल्या एका पोस्टमध्ये लिहिले आहे की, ''आमच्या बाळाचे निधन झाल्याची घोषणा अत्यंत दुःखाने करीत आहोत. सर्व पालकांसाठी हा सर्वात दुःखाचा क्षण आहे. आमच्या मुलीचा जन्म आम्हाला अभिमानास्पद आहे आणि या दुःखाच्या काळात आम्हाला सांत्वन देत आहे. या आपत्तीत ज्यांनी आम्हाला साथ दिली त्या सर्व डॉक्टर्स आणि परिचारिकांचे आम्ही आभारी आहोत.''

त्यांनी पुढे लिहिले की, ''या घटनेमुळे आम्ही खूप दु:खी आणि निराश झालो आहोत. सर्वांनी आमच्या गोपनीयतेची काळजी घेण्याचे आवाहन करीत आहोत. आमचा मुलगा आमच्यासाठी एक देवदूत होता, आम्ही त्याला नेहमी आमच्या हृदयाच्या जवळ ठेवू.''

रोनाल्डो आणि जॉर्जिनाने ऑक्टोबरमध्ये घोषणा केली होती की ते जुळ्या मुलांचे पालक होणार आहेत. यादरम्यान दोन्ही जोडप्यांनी हॉस्पिटलमधील स्वतःचा एक सुंदर फोटोही शेअर केला होता.

हेही वाचा - रणबीर कपूरचे आलियाच्या मैत्रिणींसह मजा मस्तीचे फोटो व्हायरल

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.