चेन्नई - पाचवेळा विश्व चॅम्पियन बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. आनंद यांच्या वडिलांचे निधन झालं आहे.
विश्वनाथ आनंद यांचे वडिल के. विश्वनाथन मागील काही दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर चेन्नईमधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ९२ वर्षांचे होते. दक्षिण रेल्वे विभागाचे पुर्व महाप्रबंधक राहिलेले के. विश्वनाथन यांना दोन मुले आणि एक मुलगी आहे.
के. विश्वनाथन यांची सून आणि ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंद यांची पत्नी अरुणा यांनी सांगितल की, आनंदला बुद्धिबळ क्षेत्रात कारकिर्द घडवण्यासाठी त्याच्या वडिलांनी खूप मदत केली. त्यांनी आनंदचे विश्व चॅम्पियनशीपमधील सर्व विजय पाहिले होते. त्यांनी त्यांच्या मुलावर खूप चांगले संस्कार केले होते. त्यांना आनंदच्या कामगिरीवर खूप गर्व होता.'
हेही वाचा - SRH Vs RCB : रॉयल चॅलेंजर्सचा सलग दुसरा विजय; 6 धावांनी हैदराबादला चारली धूळ
हेही वाचा - RCB VS SRH : १७ व्या षटकात सामना फिरला, ३ चेंडूमुळे हैदराबादचा घात झाला