ETV Bharat / sports

Miami Open Title : कार्लोस अल्कराझ मियामी ओपनचा विजेता, जगातील सर्वात तरुण खेळाडू - क्रिडाच्या बातम्या

कार्लोस अल्कराझने मियामी ओपनमध्ये पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावले. अंतिम फेरीत त्याने कॅस्पर रुडचा 2-0 असा पराभव केला. मियामी ओपनचे विजेतेपद पटकावणारा ( Miami Open title ) अल्काराज हा जगातील सर्वात तरुण खेळाडू आहे.

Carlos Alcaraz
Carlos Alcaraz
author img

By

Published : Apr 4, 2022, 8:07 PM IST

मियामी: स्पेनच्या कार्लोस अल्कराझने ( Spanish Carlos Alcaraz ) रविवारी मियामी ओपन स्पर्धेत पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत विजेतेपद पटकावले आहे. कार्लोस अल्कराझने जागतिक क्रमवारीत आठव्या क्रमांकावर असलेल्या कॅस्पर रुडचा ( Caspar Rudd ) एकेरीच्या अंतिम फेरीत 7-5, 6-4 असा पराभव केला. तो मियामी ओपन जिंकणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे. 18 वर्षीय अल्कराझने मास्टर्स 1000 स्पर्धेतील सर्वात तरुण पुरुष एकेरी चॅम्पियन म्हणून नोव्हाक जोकोविचची जागा घेतली.

गेल्या वर्षी यूएस ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत ( Quarterfinals of the US Open ) पोहोचलेल्या कार्लोस अल्कराझने मियामी ओपनमध्ये, कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात मास्टर्स 1000 विजेतेपद जिंकून आपले स्वप्न पूर्ण केले. उच्च दर्जाचा स्पॅनिश खेळाडू मियामी ओपनचे विजेतेपद जिंकणारा त्याच्या देशाचा पहिला खेळाडू ठरला आहे. या स्पर्धेत पहिला स्पॅनिश चॅम्पियन असलेला अल्कराझ सोमवारी एटीपी क्रमवारीत 11 व्या क्रमांकावर पोहोचेल.

स्पर्धेनंतर अल्कराझ म्हणाला, मला सध्या कसे वाटते, ते वर्णन करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. मियामीमध्ये पहिले मास्टर्स 1000 ( Miami Masters 1000 ) जिंकणे माझ्यासाठी खूप खास आहे. माझ्या विजयाने मी खूप आनंदी आहे. तसेच अल्कराझ आपल्या रणनीतीबद्दल सांगताना म्हणाला, मला माहित आहे की, कॅस्परजवळ एक मोठी योजना आहे. मी आधी त्याच्या बॅकहँडवर खेळायचा आणि प्रत्येकवेळी त्याच्या शॉटला उत्तर देण्याचा प्रयत्न केला.

अमेरिकन मायकेल चांग (टोरंटो 1990) आणि स्पेन राफेल नदाल (2005 मॉन्टे कार्लो) यांनी लहान वयात ही कामगिरी केली होती. आता हा कारनामा अल्कराझने करुन विजेतेपद मिळवले अहे. अल्कराझने सर्बियन नोव्हाक जोकोविचनला मागे टाकत सर्वात कमी वयात मियामी चॅम्पियन ( The youngest Miami champion ) म्हणून स्थान पटकावले आहे. या अगोदर 2007 मध्ये प्रथम क्रमांकावर असलेल्या जोकोविचने वयाच्या 19 वर्षी विजेतेपद पटकावले होते. तेव्हा अल्कराझ हा तीन वर्षाचा होता.

हेही वाचा -Ipl 2022, Srh Vs Lsg: नाणेफेक जिंकून सनरायझर्स हैदराबादचा प्रथम गोलंदाजीचा निर्णय;जेसन होल्डर लखनौकडून करणार पदार्पण

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.