कॅलगरी (कॅनडा) : भारताचा आघाडीचा बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनने गतविजेत्या चीनच्या ली शी फेंगचा 21-18, 22-20 असा सरळ गेममध्ये पराभव करत कॅनडा ओपन पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावले आहे. विशेष म्हणजे, लक्ष्य सेनने त्याच्यापेक्षा वरचढ खेळडूचा पराभव करत खिताब जिंकला आहे. जागतिक क्रमवारीत लक्ष्य सेन सध्या 19 व्या क्रमांकावर असून ली शी फेंग 10 व्या क्रमांकावर आहे.
लक्ष्य सेनचे कारकीर्दीतील दुसरे विजेतपद : लक्ष्यने राउंड ऑफ 32 मध्ये जागतिक क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर असलेल्या थायलंडच्या कुनलावुत विटिडसॉर्नचा पराभव केला होता. तर सेमीफायनल मध्ये जागतिक क्रमवारीत 11 व्या स्थानी असलेल्या जपानच्या केंटो निशिमोटोचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला होता. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता लक्ष्य सेनचे हे दुसरे BWF वर्ल्ड टूर विजेतेपद आहे. यापूर्वी त्याने जानेवारी 2022 मध्ये इंडिया ओपन स्पर्धा जिंकली होती.
-
21-year-old, Lakshya Sen wins Canada Open 2023
— ANI Digital (@ani_digital) July 10, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Read @ANI Story | https://t.co/dIVTXcr3XW#LakshyaSen #Badminton #CandaOpen2023 pic.twitter.com/4WaYFEfc2u
">21-year-old, Lakshya Sen wins Canada Open 2023
— ANI Digital (@ani_digital) July 10, 2023
Read @ANI Story | https://t.co/dIVTXcr3XW#LakshyaSen #Badminton #CandaOpen2023 pic.twitter.com/4WaYFEfc2u21-year-old, Lakshya Sen wins Canada Open 2023
— ANI Digital (@ani_digital) July 10, 2023
Read @ANI Story | https://t.co/dIVTXcr3XW#LakshyaSen #Badminton #CandaOpen2023 pic.twitter.com/4WaYFEfc2u
पी. व्ही. सिंधूचा पराभव : दुहेरी ऑलिम्पिक पदक विजेती पी. व्ही. सिंधूला मात्र या स्पर्धेत निराशा हाती आली आहे. तिला महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या जपानच्या अकाने यामागुची हिच्याकडून 14-21, 15-21 असा सरळ सेटमध्ये पराभव पत्करावा लागला.
वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक विजेता : लक्ष्य सेन हा भारताचा उदयोन्मुख बॅडमिंटनपटू आहे. ज्युनियर गटात तो जगातील नंबर 1 खेळाडू राहिला आहे. त्याने 2018 आशियाई ज्युनियर चॅम्पियनशिप स्पर्धेत मुलांच्या एकेरीमध्ये आणि उन्हाळी युवा ऑलिंपिकमध्ये मिश्र सांघिक स्पर्धेत सुवर्णपदके जिंकली आहेत. यासह, त्याने 2021 वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक जिंकले आहे. 2022 मध्ये प्रतिष्ठेच्या ऑल इंग्लंड ओपनमध्येही तो उपविजेता ठरला होता.
2022 मध्ये अर्जुन पुरस्काराने सन्मानित : लक्ष्य सेन 2022 थॉमस कप जिंकणाऱ्या भारतीय संघाचा देखील एक भाग होता. याशिवाय 2022 च्या राष्ट्रकुल स्पर्धेतही त्याने सुवर्णपदक जिंकले होते. लक्ष्य सेनला नोव्हेंबर 2022 मध्ये बॅडमिंटनमधील त्याच्या कामगिरीसाठी अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
हे ही वाचा :