टोकियो - नीरज चोप्रा याने शनिवारी इतिहास रचला. तो ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकणारा भारताचा पहिला अॅथलेटिक्सपटू ठरला. पुढील वर्षी होणाऱ्या आशियाई स्पर्धा, राष्ट्रकुल आणि विश्व चॅम्पियनशीपमध्ये त्याच्या कामगिरीवर सर्वांच्या नजरा असणार आहे. नीरज चोप्राने आयएएनएसला मुलाखत दिली आहे. वाचा काय म्हणाला नीरज...
प्रश्न - ट्रॅक अँड फिल्डमध्ये पहिला भारतीय सुवर्ण पदक विजेता ठरल्यानंतर कसं वाटत?
उत्तर - खूप छान वाटतं. ट्रॅक अँड फिल्डमध्ये पहिलं पदक ते ही सुवर्ण. ही शानदार सुरूवात आहे. ही भावना शब्दात मांडता येत नाही. पोडियमवर सुवर्ण पदकासह थांबल्यानंतर भारताचे राष्ट्रगीत वाजवण्यात आलं, हा क्षण अभिमानाचा आहे. मला वाटतं की, भारतीय अॅथलेटिक्सचे भविष्य चांगलं आहे.
प्रश्न - दिवंगत मिल्खा सिंग यांना पदक समर्पित केलसं
उत्तर - यामाग एक खास कारण आहे. मी मिल्खा सिंग याचे अनेक व्हिडिओ पाहत होतो. यात त्यांनी अॅथलेटिक्समध्ये पदकाची इच्छा बोलून दाखवली होती. जेव्हा मी पदक जिंकलं आणि राष्ट्रगीत सुरू झालं. मी दु:खी होतो कारण ते आज आपल्यात नाहीत. पण त्यांची इच्छी माझ्याकडून पूर्ण झाली. ते कुठेही असतील तर त्याचे स्वप्न पूर्ण झालं आहे. पी टी उषा यांच्यासारखे अॅथलिट जेव्हा चौथ्या स्थानावर येत होते आणि त्यांच पदक हुकतं होते. असे खेळाडू आज खूप खुश असतील. त्याची इच्छा पूर्ण झाली.
प्रश्न - शनिवारी अंतिम सामन्यादरम्यान, प्रत्येक थ्रो नंतर तुमच्या मनात काय चाललं होतं? तुला सुवर्णपदक जिंकता येईल, असे कधी वाटू लागले?
उत्तर - अंतिम सामन्यात माझ्या मनात प्रत्येक थ्रो सर्वोत्तम देण्याचा विचार होता. मला वाटलं की, मी आज माझे वैयक्तिक सर्वोत्तम देईन. पण भालाफेक हा खेळ तांत्रिक खेळ आहे. यात जर एक लहान समस्या झाली तर त्याचा परिणाम अंतरावर होतो. राष्ट्रीय विक्रम न मोडण्याची किंवा माझी वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी करण्याची चिंता नाही. पण ऑलिम्पिक सुवर्ण जिंकण्याची स्वतःची वेगळी चमक आहे. मी जेव्हा अंतिम थ्रो साठी गेलो तेव्हा माझ्या मनात आलं की, सुवर्ण पदक माझं आहे. तोपर्यंत माझ लक्ष्य अंतिम सामन्यावर होतं.
प्रश्न - मागील वर्षे ज्या पद्धतीने गेली त्यानंतर हे पदक जिंकल्यानंतर किती चांगलं वाटत आहे. दुखापतीमुळे 2019 मध्ये तू बाहेर पडलास आणि त्यानंतर कोरोना महामारी सुरू झाली. त्या वर्षामध्ये तुझे प्रयत्न पाहता तुला आता कस वाटतं आहे.
उत्तर - मला वाटत की या सुवर्ण पदकाने सर्व काही ठीक केलं. 2019 मध्ये दुखापतीमुळे तर 2020 कोरोना महामारीमुळे नुकसान झालं. ऑलिम्पिक पदक आणि खासकरून सुवर्ण प्रत्येक अॅथलिटचे स्वप्न असते. मला वाटत जी वाईट वेळ आली, त्याबद्दल मला काही वाटत नाही. मी सुवर्ण पदक जिंकण्यासाठी जी वेळ सहन केली त्याबाबत मी संतुष्ट आहे.
प्रश्न - अंतिम सामन्याआधी प्रशिक्षक क्लॉस बार्टोनिट्स यांनी तुला काय सांगितलं. तु त्यांच्याशी किंवा परिवार, मित्र यांच्यातील कोणाशी बोलला होता का?
उत्तर - अंतिम सामन्याआधी प्रशिक्षकांनी मला सांगितलं होतं की, तु पहिला थ्रो चांगल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न कर. जशा थ्रो तू पात्रता फेरीत केला होतास. याशिवाय मी माझे लहान काका भीम चोप्रा यांच्याशी बोललो होते. तसेच मी माझे सिनियर जयवीर यांच्याशी देखील बोललो. मी ज्याच्याशी बोललो, त्यांना वाटलं की, काही चांगलं होणार आहे. तु फक्त सर्वोत्कृष्ठ कामगिरी कर. जेव्हा मी सुवर्ण पदक जिंकलो. तेव्हा प्रत्येक जण खूश होता.
प्रश्न - ऑलिम्पिक पोडियमच्या सर्वोच्य स्थानावर थांबून, राष्ट्रगीत ऐकत आणि त्यानंतर राष्ट्रीय ध्वज तिंरगा फडकावला गेला. हा अनुभव कसा होता. यावेळी तुझ्या डोक्यात काय सुरू होतं.
उत्तर - सुवर्ण पदक, राष्ट्रीय ध्वज आणि राष्ट्रगीत ऐकून मी माझं सर्व कष्ट समस्या विसरून गेलो. हे सर्व त्याच्यासाठीच होतं. या अनुभवाचे वर्णन करण्यासाठी शब्द नाहीत. हे फक्त अनुभवू शकतो. मला कल्पना आहे यावेळी कसं वाटतं.
प्रश्न - तुझं पुढचं लक्ष्य काय आहे.
उत्तर - आता सुवर्ण पदक जिंकलं आहे तर मी पुढील काही दिवस घरच्यासोबत जल्लोष साजरा करेन. मी जर आणखी ट्रेनिंग चांगल्या प्रकारे केली तर मी या वर्षी काही स्पर्धांमध्ये भाग घेईन. नाहीतर मी पुढील वर्षी राष्ट्रकुल स्पर्धा, आशियाई स्पर्धा आणि विश्व चॅम्पियनशीपवर लक्ष्य केंद्रीत करेन.
प्रश्न - तु तर सोशल मीडियावर खूप प्रसिद्ध झालास. काही दिवसात तुझे फॉलोअर्स लाखोच्या संख्येने वाढले आहेत. सोशल मीडिया स्टार झाल्यानंतर आता तु या नव्या अटेंशन कडे कसं पाहतो.
उत्तर - सोशल मीडियावर पाहिलं की, अचानक माझे फॉलोवर्स वाढले. खासकरून ऑलिम्पिक पदक जिंकल्यानंतर. कारण सर्वांनी अंतिम सामना पाहिला होता. ही बाब चांगली वाटते कारण कधी कधी मी व्यायाम तसेच सरावाचे फोटो ट्विट करत होतो. प्रत्येक जण मला शुभेच्छा देत आहे. मला खूप छान वाटतं. पण मी नेहमी खेळावर लक्ष्य केंद्रीत करण्याचा प्रयत्न करतो. कधीतर मी सोशल मीडिया पाहतो.
प्रश्न - तुझ्या आईने सांगितलं की ती घरी चूरमा बनवला आहे आणि तुझी वाट पाहत आहे. भारतात परतल्यानंतर तुझा प्लॅन काय आहे?
उत्तर - मी माझ्या घरी जाईन आणि चूरमासह माझी आईने बनवलेले पदार्थ खाईन. ज्या उद्देशाने मी टोकियोला आलो होतो. तो पूर्ण झाला आहे. आता भारतात आल्यानंतर घराचं जेवण आणि आपल्या परिवारासह आनंद साजरा करेन. त्यानंतर मी सरावाला सुरू करणार आहे.
प्रश्न - लोक म्हणत आहेत की तुझ्या बायोपिकमध्ये तु स्वत:च रोल केलं पाहिजे. याविषयी तु काय विचार करतो आणि तुझा याविषयी विचार नसेल तर तु कोणाला आपल्या भूमिकेसाठी पसंती देशील.
उत्तर - मी याविषयी जास्त विचार करत नाही. सद्या माझं लक्ष्य खेळावर आहे. जेव्हा मी खेळणं बंद करेन तेव्हा बायोपिकचे पाहू. कारण आता मला अधिक सराव करत पदक जिंकायचे आहे. करियर सुरू असताना मी बायोपिकविषयी विचार करत नाही. रिटायर झाल्यानंतर यात यायला काही हरकत नाही.