नवी दिल्ली अखिल भारतीय फुटबॉल महासंघावर AIFF लादलेली बंदी, जागतिक फुटबॉल फिफाच्या प्रशासकीय समितीच्या उठवली आहे. या बंदी उठवण्याच्या निर्णयाचे भारतीय फुटबॉलपटू बायचुंग भुतियाने Indian footballer Baichung Bhutia स्वागत केले आहे. भुतिया म्हणाला की, ही व्यवस्था बदलण्याची वेळ आली आहे.
सुप्रीम कोर्टाने प्रशासक समिती COA बरखास्त केल्यानंतर FIFA ने AIFF वर घातलेली बंदी उठवली, ज्यामुळे भारताला FIFA U-17 महिला विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. भुतिया पीटीआयला म्हणाला की, ही चांगली बातमी आहे. एआयएफएफवर घातलेली बंदी उठवण्याच्या फिफाच्या निर्णयाचे मी स्वागत करतो. हा भारतीय फुटबॉलचा विजय आहे.
बायचुंग भुतिया,"मला आमच्या युवा खेळाडूंसाठी आनंद आहे. कारण आता त्यांना महिला अंडर-17 विश्वचषकात त्यांच्या वयोगटातील सर्वोत्तम खेळाडूंसोबत खेळण्याची संधी मिळणार आहे," तो म्हणाला, FIFA ने 15 ऑगस्ट रोजी तृतीय पक्षांच्या अवाजवी प्रभावामुळे AIFF वर बंदी घातली होती.
2 सप्टेंबर रोजी होणार्या एआयएफएफ निवडणुकीत अध्यक्षपदाच्या शर्यतीत Baichung Bhutia in AIFF President race असलेले भूतिया म्हणाले की, भविष्यात निलंबनाची परिस्थिती उद्भवू नये, यासाठी देशाच्या फुटबॉल प्रशासनात बदल करण्याची वेळ आली आहे. भूतिया म्हणाला, धडा शिकण्याची आणि भारतीय फुटबॉल प्रशासनात बदल आणि सुधारणा घडवून आणण्याची हीच वेळ आहे. व्यवस्थेत बदल हवा आहे. मला विश्वास आहे की, जर आपल्याकडे चांगली यंत्रणा आणि प्रशासनात चांगले लोक असतील, तर भारतीय फुटबॉल नवीन उंची गाठू शकेल.
हेही वाचा - Asia Cup 2022 भावनिक होऊन कोहली म्हणाला, 10 वर्षांत पहिल्यांदाच धरली नाही महिनाभर बॅट