ETV Bharat / sports

Border Gavaskar Trophy 2023 : सौराष्ट्राचा जयदेव उनाडकटला बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2023 मधून केले मुक्त; पाहा नेमके काय आहे कारण

वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकटला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतून मुक्त करण्यात आले आहे. त्याच्याकडे रणजी करंडक स्पर्धेसाठी पुन्हा सौराष्ट्र संघाची जबाबदारी देण्यात आली आहे. सौराष्ट्रचा संघ रणजीच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. अंतिम फेरीत सौराष्ट्रचा सामना बंगालशी होणार आहे.

Border Gavaskar Trophy 2023
सौराष्ट्राचा जयदेव उनाडकटला बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2023 मधून केले मुक्त; पाहा नेमके काय आहे कारण
author img

By

Published : Feb 13, 2023, 6:09 PM IST

नवी दिल्ली : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीची दुसरी कसोटी १७ फेब्रुवारीपासून दिल्लीत खेळवली जाणार आहे. पहिल्या कसोटीत भारताने ऑस्ट्रेलियाचा एक डाव आणि १३२ धावांनी पराभव करीत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. आता दुसरी कसोटी जिंकण्यासाठी भारतीय संघ चांगलाच घाम गाळत आहे. दरम्यान, भारताचा वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकटला भारतीय संघातून मुक्त करण्यात आल्याची बातमी बीसीसीआयकडून आली आहे. या मालिकेतील दोन कसोटी सामन्यांसाठी जयदेवची निवड करण्यात आली. दिल्लीत होणाऱ्या कसोटी सामन्यासाठी त्याच्या नावाचाही संघात समावेश करण्यात आला होता. मात्र, प्लेइंग इलेव्हनमध्ये त्याचे नाव नव्हते.

रोहित शर्मा आणि राहुल द्रविड यांच्या संमतीने : बीसीसीआयच्या म्हणण्यानुसार, कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या संमतीनंतर जयदेवला रणजी ट्रॉफी फायनलमध्ये सौराष्ट्रकडून खेळण्यासाठी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकट हा सौराष्ट्र संघाचा कर्णधार आहे. ऑस्ट्रेलिया मालिकेत नाव आल्यानंतर जयदेवने रणजी संघ सोडला होता. मात्र आता सौराष्ट्रने रणजी करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. अशा परिस्थितीत बीसीसीआयने रणजी फायनलसाठी जयदेवचा पुन्हा सौराष्ट्र संघात समावेश केला आहे. कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर 16 फेब्रुवारीला सौराष्ट्रचा सामना बंगालशी होणार आहे.

दोन आंतरराष्ट्रीय कसोटी सामन्यांसाठी उनाडकटची निवड : उल्लेखनीय म्हणजे, 31 वर्षीय वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकटने 2010 मध्ये सेंच्युरियनमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. यानंतर जयदेवला प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर डिसेंबर २०२२ मध्ये बांगलादेशविरुद्ध कारकिर्दीतील दुसरा कसोटी सामना खेळण्याची संधी मिळाली. त्याच वेळी, त्याची ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांसाठी बॉर्डर गावस्कर ट्रॉफी 2023 साठी निवड झाली. मात्र, त्याला रणजी फायनलसाठी सोडण्यात आले आहे. याआधी जयदेवने 2013 मध्ये भारतीय संघासाठी 9 एकदिवसीय सामनेही खेळले आहेत.

सौराष्ट्राची ताकद नक्कीच वाढणार : सौराष्ट्रने रणजी ट्रॉफीच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात कर्नाटकचा चार गड्यांनी पराभव केला होता. या सामन्यात कर्नाटकचा कर्णधार मयांक अग्रवालने शतकी खेळी केली होती. कर्नाटक संघाने पहिल्या डावात 407 तर दुसऱ्या डावात 234 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरदाखल सौराष्ट्राने पहिल्या डावात 527 धावांचा डोंगर उभारला होता. तर दुसऱ्या डावात चार गडी राखून 117 धावा करीत सामना जिंकला. आता फायनल सुरू होण्यापूर्वी सौराष्ट्राला खूशखबर मिळाली आहे. जयदेव उनादकट फायलनमध्ये खेळणार असल्याने सौराष्ट्राची ताकद नक्कीच वाढणार आहे.

हेही वाचा : Women IPL Auction 2023 : भारताची स्मृती मानधना ठरली सर्वात महागडी क्रिकेट खेळाडू; स्मृतीला राॅयल चॅलेंजर्सने 3.4 कोटींना केले खरेदी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.