रोम - भारताचा कुस्तीपटू बजरंग पुनियाने रोममध्ये सुरू असलेल्या मातेओ पेलिकोन वर्ल्ड रँकिंग सीरिजच्या ६५ किलो वजनी गटातीत अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. जागतिक स्पर्धेत कांस्यपदक विजेता बजरंगचा सामना मंगोलियाच्या तुलगा तुमर ओचिरशी होणार आहे. पुनिया कोरोनामुळे एक वर्षानंतर एखाद्या स्पर्धेत खेळत आहे.
२७ वर्षीय पुनियाने उपांत्य फेरीत अमेरिकेच्या जोसेफ ख्रिस्तोफरचा ६-३असा पराभव करून सुवर्णपदकाच्या सामन्यात प्रवेश केला. उपांत्यपूर्व फेरीत त्याने तुर्कीच्या सेलीम कोझानचा ७-०असा पराभव केला. रोहितही कांस्यपदकाच्या सामन्यासाठी मॅटवर उतरणार आहे. या लढतीत त्याला तुर्कीचा हमजा अलका आव्हान देईल.
७४ किलो वजनी गटामध्ये राष्ट्रीय चॅम्पियन संदीप सिंगला पोर्तुगालच्या गोमेझ मॅटोसकडून मात खावी लागली. तर, नरसिंग यादवलाही उपांत्य फेरीच्या सामन्यात अमेरिकेच्या ऑलिम्पिक चॅम्पियन जॉर्डन बुरोसकडून 1–4 असा पराभव पत्करावा लागला.