सोनीपत - टोकियो ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचल्यानंतर भारतीय संघासोबत कास्य पदक विजेता बजरंग पुनिया देखील भारतात परतला. देशाची राजधानी दिल्लीमध्ये सोमवारी सात मेडलिस्ट समवेत अन्य खेळाडूंचे भव्य स्वागत झाले. बजरंग पुनियाचा क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर, कायदेमंत्री किरेन रिजिजू यांनी सन्मान केला. सन्मान सोहळ्यानंतर ईटीव्ही भारतशी बजरंग पुनियाने बातचित केली. या बातचितमध्ये त्याने त्याचा ऑलिम्पिक अनुभव, फ्यूचर प्लॅन आणि सुट्टीच्या बाबतीत सांगितलं.
बजरंग पुनियाने टोकियो ऑलिम्पिकमधील प्रदर्शनाविषयी सांगितलं की, मी माझं सर्वश्रेष्ठ देण्याचा प्रयत्न केला. पण दुखापत डोकेदुखी ठरली. दुखापतीमुळे मी सामन्याच्या आधी 25 दिवस सराव करू शकलो नाही. सामन्यात दुखापत आणखी वाढू शकली असती, पण मी तरी देखील याची तमा बाळगली नाही. ऑलिम्पिकनंतर रिकवर होण्यासाठी खूप वेळ आहे. पण दुखापतीमुळे मी सुवर्ण पदकासाठी सर्वोत्कृष्ठ योगदान देऊ शकलो नाही.
फ्यूचर प्लॅनविषयी बजरंग पुनिया म्हणाला, सद्या कोणती स्पर्धा नाहीये. यामुळे मी काही वेळ घरच्यांना देऊ इच्छितो. मी माझ्या आईने बनवलेला गूळ-चूरमा आणि वहिनीने बनवलेला पराठे खाणार आहे. पुढील काही दिवस मी घरचे जेवण जेवणार आहे. घरात आई वडिलांना वेळ देईन. यात दुखापतीला देखील रिकवर होण्यास मदत मिळेल. यानंतर मी अशियाई, राष्ट्रकुल आणि ऑक्टोंबरमध्ये होणाऱ्या विश्व चॅम्पियनशीपच्या सरावात गुंतून जाईन.
ईटीव्ही भारतला बोलताना बजरंग पुनिया म्हणाला की, येणारा काळ हरियाणाच्या कुस्तीपटूंसाठी चांगला आहे. बजरंगने कुस्तीपटू रवी कुमार दाहियाचे कौतूक केलं. तो म्हणाला, ऑलिम्पिकमध्ये रवी कुमार दहियाने चांगलं प्रदर्शन केलं. 20-25 वर्षात जेव्हा रवी कुमार दहिया पदक आणू शकतो. तो येणाऱ्या काळात तो आणखी चांगलं प्रदर्शन करेल. तो युवा खेळाडूंचा प्रेरणास्त्रोत ठरला आहे.
दरम्यान, टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताने इतिहास रचला. यावेळी भारताने एकूण 7 पदके जिंकली. जी की आत्तापर्यंतच्या ऑलिम्पिकमधील भारताची सर्वश्रेष्ठ कामगिरी ठरली. यात एक सुवर्ण, दोन रौप्य आणि चार कास्य पदकांचा समावेश आहे.
हेही वाचा - बजरंग पुनियाचे ग्रँड स्वागत; उघड्या जीपमधून काढली मिरवणूक
हेही वाचा - हे सुवर्ण पदक माझ्या एकट्याचं नाही तर संपूर्ण देशाचं - नीरज चोप्रा