मुंबई - भारताची स्टार कुस्तीपटू बबिता फोगाटला सोमवारी पुत्ररत्नाचा लाभ झाला आहे. याची माहिती खुद्द बबिताने ट्विटरवरून दिली.
'आमच्या मुलाला भेटा, स्वप्नांवर विश्वास ठेवा, ते पूर्ण होतात. आमचे पूर्ण झाले आहे, निळ्या कपड्यांमध्ये पाहा, अशा आशयाची पोस्ट बबिताने शेअर केली आहे. बबिताने तिच्या मुलाचा फोटोही शेअर केला आहे.
-
“Meet our little SONshine.”🧿
— Babita Phogat (@BabitaPhogat) January 11, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
“Believe in dreams; they do come true. Ours came dressed in blue!”💙
#mother #love #care pic.twitter.com/66CE8b43tx
">“Meet our little SONshine.”🧿
— Babita Phogat (@BabitaPhogat) January 11, 2021
“Believe in dreams; they do come true. Ours came dressed in blue!”💙
#mother #love #care pic.twitter.com/66CE8b43tx“Meet our little SONshine.”🧿
— Babita Phogat (@BabitaPhogat) January 11, 2021
“Believe in dreams; they do come true. Ours came dressed in blue!”💙
#mother #love #care pic.twitter.com/66CE8b43tx
बबिता फोगाट आणि विवेक सुहाग हे दोघेही कुस्तीपटू आहे. विवेक हा भारत केसरी पुरस्कार प्राप्त कुस्तीपटू आहे. तर बबिता फोगाट भारताची स्टार कुस्तीपटू आहे. तिने कॉमनवेल्थ गेम्समध्ये एक सुवर्ण आणि दोन रौप्यपदकाची कमाई केली आहे. तसेच जागतिक कुस्ती स्पर्धेत तिने कांस्यपदकाची मानकरी ठरली आहे.
बबिता आणि विवेकने हे दोघे पाच वर्षापासून रिलेशनमध्ये होते. त्यांनी 2 डिसेंबर 2019 रोजी लग्नगाठ बांधली. नोव्हेंबर 2020 मध्ये बबिताने इन्स्टाग्रामवर पोस्ट करत आई होणार असल्याची बातमी दिली होती.
सोमवारी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली व अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या घरात चिमुकल्या पाहुणीचे आगमन झाले आहे. अनुष्काने गोंडस मुलीला जन्म दिला आहे.
हेही वाचा - हिटमॅन रोहितच्या 'विरुष्का'ला अनोख्या शुभेच्छा
हेही वाचा - भारतीय संघाला आणखी एक धक्का, जसप्रीत बुमराह दुखापतग्रस्त