ETV Bharat / sports

David Warner Injured : ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हीड वॉर्नरच्या हाताला फ्रॅक्चर; पुढील दोन कसोटी सामन्यातून बाहेर - David Warners Test Series Disappointment

ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर हाताला झालेल्या दुखापतीमुळे पुढील दोन कसोटी सामने खेळू शकणार नाही. मोहम्मद सिराजच्या चेंडूवर त्याच्या हाताच्या कोपऱ्याला गंभीर दुखापत झाल्याचे एक्स-रे स्कॅनमध्ये निदर्शनास आले आहे. डाॅक्टरांनी त्याला विश्रांतीचा सल्ला देत, उपचार घेण्यासाठी सांगितले आहे.

David Warner injured
ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हीड वॉर्नरच्या हाताला फ्रॅक्चर
author img

By

Published : Feb 21, 2023, 1:43 PM IST

इंदूर/मध्य प्रदेश : ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज डेव्हिड वॉर्नर सध्या सुरू असलेल्या बॉर्डर-गावस्कर मालिकेतील पुढील दोन कसोटींमध्ये खेळू शकणार नाही. त्याच्या डाव्या हाताच्या कोपऱ्याला फ्रॅक्चर झाल्याने गंभीर दुखापत झाली आहे. ऑस्ट्रेलियाकडून फलंदाजी करताना मोहम्मद सिराजच्या चेंडूचा फटका हाताच्या कोपऱयाला जोरात बसला, तरीही तो खेळपट्टीवर खेळत होता. परंतु, या दुखापतीने तो 15 धावांची खेळी करू शकला. परत आल्यानंतर हाताचे स्कॅन केल्यानंतर हेअरलाइन फ्रॅक्चर झाल्याचे आढळून आले. त्याची रिकव्हरी होण्यासाठी वेळ लागणार असल्याचे डाॅक्टरांनी सांगितल्याने, त्याला परत सिडनीला जाणे भाग पडले आहे.

वॉर्नरला विश्रांतीचा सल्ला : टीम ऑस्ट्रेलियाच्या डाॅक्टरांनी त्याच्या फिटनेसबाबत चिंता व्यक्त करीत, त्याला विश्रांतीचा सल्ला दिला आहे. त्यामुळे तो आता सिडनीला जाऊन उपचार घेण्यास सज्ज झाला आहे. तिथे उपचार घेऊन तो पुन्हा तंदुरुस्त होऊन वनडे इंटरनॅशनल खेळू शकतो, असेही डाॅक्टरांनी सांगितले. ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिका (वनडे मॅच) 17 मार्चपासून सुरू होणार आहेत. तोपर्यंत त्याची रिकव्हरी होऊन तो खेळण्यासाठी फिट होऊ शकतो, असे तज्ज्ञांनी सांगितले.

वॉर्नरची कामगिरी निराशाजनक : त्याच्या दुखापतीपूर्वीही, वॉर्नर भारताविरुद्ध झालेल्या कसोटी सामन्यात विशेष कामगिरी करू शकला नव्हता. त्याने तीन सामन्यांमध्ये केवळ 1, 10 आणि 15 धावा केल्या. तीन अपयशांमुळे त्याची भारतातील सरासरी १९ कसोटी डावांतून २१.७८ इतकी खाली आली आहे. त्याच्या अनुपस्थितीत, ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात ट्रॅव्हिस हेडसह सुरुवात केली, ज्यामध्ये डायनॅमिक फलंदाजाने 43 धावा केल्या. मुख्य प्रशिक्षक अँड्र्यू मॅकडोनाल्ड यांनी सोमवारी (20 फेब्रुवारी) पुष्टी केली की, वॉर्नर दुखापतीमुळे संघाबाहेर झाल्यास हेड सलामीवीर म्हणून कायम राहील.

मॅकडोनाल्ड यांची रणनीती : आम्ही येथे येण्यापूर्वी चर्चा केली होती की, जर आमचे सलामीवीर काही कारणाने (फिटनेस) संघाबाहेर राहिले, तर आमचा ट्रॅव्ह एक असेल की आम्ही तरीही आमचा सामना पूर्ण खेळणार. आम्हाला उपखंडीय परिस्थितीत असे वाटते की त्याने दाखवलेल्या जलद सुरुवातीस तो उतरू शकतात, असेही मॅकडोनाल्ड यांनी सांगितले. आम्ही हेडला सर्व परिस्थितींमध्ये सलामीवीर म्हणून पाहत नाही, अधिक उपखंडीय आणि इतर स्थितीत मधल्या फळीपर्यंत त्याला आम्ही खेळवू शकतो. अकिलीसच्या दुखापतीमुळे जोश हेझलवूडला हरवलेल्या ऑस्ट्रेलियाला फलंदाजी अधिक मजबूत करण्याची शक्यता नाही.

टीम ऑस्ट्रेलियाची कामगिरी : बॉर्डर गावस्कर मालिकेतील दुसऱ्या टेस्टमध्ये टीम इंडियाने शानदार बाॅलिंग करीत सामना जिंकला. भारताने मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. दुसऱ्या डावात मिळालेले 114 धावांचे लक्ष भारताने 4 गड्यांच्या मोबदल्यात सहजरित्या गाठले. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना भारताने जिंकला आहे. भारताने ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव 31.1 षटकात 113 धावांवर गुंडाळला. त्यानंतर मिळालेले 114 धावांचे लक्ष्य भारताने चार गडी गमावून पूर्ण केले. भारताने 118 धावा केल्या. चेतेश्वर पुजाराने 31 आणि केएस भरतने 23 धावांची नाबाद खेळी केली.

हेही वाचा : Sapna Gill Selfie Controversy : पृथ्वी शॉसोबत सेल्फी वादात अडकलेल्या सपना गिलला अखेर जामीन

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.