नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज स्टीव्ह स्मिथ यावेळी आयपीएलमध्ये नव्या भूमिकेत दिसणार आहे. स्टीव्ह स्मिथ यावेळी आयपीएल खेळणार नसून, वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. त्याने त्याच्या इंटरनेटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये स्मिथ त्याच्या आयपीएल 2023 मधील प्रवेशाबद्दल सांगत आहे. आयपीएल लिलावात स्टीव्ह स्मिथसाठी कोणत्याही संघाने बोली लावली नव्हती. स्मिथने 2021 मध्ये दिल्ली कॅपिटल्सच्या वतीने शेवटची आयपीएल खेळली होती. यानंतर, 2022 मध्ये, स्टीव्ह स्मिथ विकला गेला नाही. यामुळे त्याने लिलावातून आपले नाव मागे घेतले होते.
वेगळ्या भूमिकेत दिसणार : ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज फलंदाज स्टीव्ह स्मिथने त्याच्या ट्विटर हँडलवरून 14 सेकंदाचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये स्टीव्ह स्मिथने तो आयपीएल 2023 मध्ये खेळणार की नाही हे स्पष्ट केले आहे. याबाबत माहिती देताना स्मिथ व्हिडीओमध्ये दिसत आहे. स्मिथने म्हटले की, तो लवकरच आयपीएलमध्ये सहभागी होणार आहे. मात्र, आयपीएलमध्ये तो मैदानावर खेळताना दिसणार नसून, वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. यावेळी स्मिथ स्पर्धेत समालोचन करताना दिसणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
- — Steve Smith (@stevesmith49) March 27, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
— Steve Smith (@stevesmith49) March 27, 2023
">— Steve Smith (@stevesmith49) March 27, 2023
पोस्ट करीत दिला संदेश : स्टीव्ह स्मिथने अद्याप या प्रकरणाला दुजोरा दिलेला नाही. सोमवारी हा व्हिडीओ पोस्ट करीत स्मिथने चाहत्यांना एक संदेश दिला आहे. यामध्ये त्यांनी सर्वप्रथम 'नमस्ते इंडिया' म्हणत देशाचा गौरव केला आहे. त्यानंतर तो म्हणाला की, तुम्हा सर्वांसाठी माझ्याकडे एक आनंदाची बातमी आहे. मी आयपीएल 2023 मध्ये सामील झालो आहे. यासह मी आता टीम इंडियामध्ये सहभागी होणार आहे. आयपीएलमध्ये मी असणार आहे, परंतु एका वेगळ्या भूमिकेत मी दिसणार आहे.
6 आयपीएल संघांसाठी : स्टीव्ह स्मिथ कोणत्या फ्रँचायझीशी संबंधित आहे? स्टार फलंदाज स्टीव्ह स्मिथने आतापर्यंत जवळपास 6 आयपीएल संघांसाठी क्रिकेट खेळले आहे. त्याने आपल्या करिअरमध्ये आयपीएल 2010 मध्ये पदार्पण केले. याशिवाय तो कोची टस्कर, पुणे सुपरजायंट्स आणि पुणे वॉरियर्सकडूनही खेळला आहे. यानंतर 2019 मध्ये स्मिथने राजस्थान रॉयल्सचे कर्णधारपदही भूषवले. पण राजस्थानने त्याला २०२० मध्ये सोडले. यानंतर त्याने 2022 मध्ये दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्वही केले. पण 2023 मध्ये तो कोणत्याही संघासोबत खेळणार नाही. त्याच्या ऍशेस मालिकेचा विचार केला जात आहे.
हेही वाचा : New Zealand Vs Sri Lanka : आज न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका दुसरा एकदिवसीय सामना, न्यूझीलंड 1-0 ने आहे आघाडीवर