गुवाहाटी - आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी शुक्रवारी आंतरराष्ट्रीय धावपटू हिमा दासला पोलीस उपअधीक्षक (डीएसपी) पदावर नियुक्तीचे औपचारिकपणे पत्र दिले. हिमाची एकात्मिक क्रीडा धोरणांतर्गत नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांनी आसाम पोलिसात नव्याने भरती झालेल्या ५९७ उपनिरीक्षकांना नियुक्तीपत्रेही दिली.
राज्य शासनाचे उच्चपदस्थ अधिकारी आणि पोलीस महासंचालकांसह, पोलीस विभागातील इतर अधिकारीही समारंभाला उपस्थित होते. डीएसपी म्हणून पदभार घेतल्यानंतर झालेल्या समारंभाला संबोधित करताना २१ वर्षीय हिमाने सांगितले की, तिने लहान असताना पोलीस अधिकारी होण्याचे स्वप्न पाहिले होते.
-
Welcome Aboard!
— Assam Police (@assampolice) February 26, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Heartiest Congratulations to @HimaDas8 and all 597 newly selected Sub Inspectors of Assam Police.
Together, we'll write a new saga of people friendly policing in the State, to serve the citizens of Assam.@CMOfficeAssam @DGPAssamPolice#SIsRecruitment pic.twitter.com/KBeFUGHLuW
">Welcome Aboard!
— Assam Police (@assampolice) February 26, 2021
Heartiest Congratulations to @HimaDas8 and all 597 newly selected Sub Inspectors of Assam Police.
Together, we'll write a new saga of people friendly policing in the State, to serve the citizens of Assam.@CMOfficeAssam @DGPAssamPolice#SIsRecruitment pic.twitter.com/KBeFUGHLuWWelcome Aboard!
— Assam Police (@assampolice) February 26, 2021
Heartiest Congratulations to @HimaDas8 and all 597 newly selected Sub Inspectors of Assam Police.
Together, we'll write a new saga of people friendly policing in the State, to serve the citizens of Assam.@CMOfficeAssam @DGPAssamPolice#SIsRecruitment pic.twitter.com/KBeFUGHLuW
आसाम सरकारने, राज्य सरकारच्या वेगवेगळ्या विभागातील क्लास-१ आणि क्लास-२ अधिकाऱ्यांच्या पदासाठी क्रीडापटूंना प्राधान्य देण्याचे ठरवले आहे. यात हिमा दासला पोलीस उपअधीक्षक म्हणून नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे.
हिमा दासची कामगिरी
हिमा दास आसामच्या नगाव जिल्ह्यातील ढिंग गावाची रहिवाशी असून तिचे वडील शेतकरी आहेत. हिमाने २०१८ मध्ये फिनलँड येथे झालेल्या २० वर्षांखालील जागतिक चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकले होते. अशी कामगिरी करणारी हिमा भारताची पहिलीच धावपटू आहे. याशिवाय तिने जकार्ता आशियाई क्रीडा स्पर्धेत ४०० मीटरमध्ये रौप्य, चार वेळा ४०० मीटरमध्ये रिले आणि चार वेळा ४०० मीटरमध्ये सुवर्णपदक जिंकले आहे. तिला २०१८ मध्ये अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
हेही वाचा - भारताच्या वर्ल्डकप विजेत्या संघातील खेळाडूची क्रिकेटमधून निवृत्ती