ETV Bharat / sports

Asian Games 2023 : महिला हॉकीत जपानला हरवून भारताची कांस्यपदकाला गवसणी - Sushila Chanu

Asian Games 2023 भारतीय संघानं जपानचा 2-1 असा पराभव करून आशियाई क्रीडा स्पर्धेच्या इतिहासातील चौथं कांस्यपदक जिंकलंय. दीपिकाच्या पहिल्या गोलनंतर सुशीला चानूनं भारतासाठी विजयी गोल केला.

Asian Games 2023
Asian Games 2023
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 7, 2023, 3:59 PM IST

हँगझोऊ Asian Games 2023 : आशियाई खेळ 2023 हॉकीच्या कांस्यपदकाच्या सामन्यात भारतीय महिला संघानं शनिवारी जपानचा पराभव करत कांस्यपदक जिंकलं. 2014 नंतर आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचं हे चौथं महिला हॉकी कांस्यपदक आहे. भारतीय महिला हॉकी संघानं 2018 लासी रौप्य पदक जिंकलं होतं. भारताकडून दीपिका, सुशीला चानूनं गोल केले, तर जपानसाठी एकमेव गोल युरी नागाईनं तीसाव्या मिनिटाला केला.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

टीम इंडियाला 1-0 अशी आघाडी : भारतीय महिला हॉकी संघानं चीनच्या हँगझोऊ येथील गोंगशु कॅनाल स्पोर्ट्स पार्क स्टेडियमवर कांस्यपदक जिंकण्यासाठी आक्रमकपणे सामन्याची सुरुवात केली. पाचव्या मिनिटाला भारताला पेनल्टी स्ट्रोक घेण्याची संधी होती, ज्याचं दीपिकानं गोलमध्ये रुपांतर करत टीम इंडियाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली.

जपानच्या युरी नागाईनं केला गोल : यानंतर भारतीय संघानं पहिल्या क्वार्टरमध्ये सतत चेंडूवर नियंत्रण ठेवलं. त्यामुळं जपानच्या खेळाडूंना गोल करण्याची एकही संधी मिळाली नाही. दुसऱ्या क्वार्टरमध्येही भारतीय खेळाडूंनी आपलं वर्चस्व कायम राखलं. मात्र, सामन्याचा पूर्वार्ध पूर्ण होण्याआधीच जपानच्या युरी नागाईनं पेनल्टी कॉर्नरच्या संधीचं रुपांतर करत स्कोअर 1-1 सामना बरोबरीत आणला. सामन्यात 1-1 अशी बरोबरी साधल्यानंतर आत्मविश्वासानं भरलेल्या जपानच्या संघानं आक्रमक खेळ करत आघाडी घेण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी भारतीय संघाकडून सातत्यानं प्रयत्न सुरूच राहिले. मात्र तिसऱ्या क्वार्टरमध्ये दोन्ही संघांना एकही गोल करता आला नाही.

कांस्यपदक जिंकलं : चौथ्या आणि शेवटच्या क्वार्टरमध्ये भारतीय संघानं 50 व्या मिनिटाला आणखी एक गोल नोंदवून आपली आघाडी कायम केली. भारतीय संघाचा दुसरा गोल सुशीला चानूनं पेनल्टी कॉर्नरवरून केला. यानंतर सामन्यात आणखी एकही गोल होऊ शकला नाही. हॉकी क्रमवारीत सातव्या क्रमांकावर असलेल्या भारतीय महिला संघानं जागतिक क्रमवारीत अकराव्या क्रमांकावर असलेल्या जपान संघाचा 2-1 असा पराभव करत कांस्यपदक जिंकलं.

भारत, जपान आमनेसामने : जकार्ता 2018 आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारत, जपान आमनेसामने आले होते. जिथं जपाननं 2-1 ने विजय मिळवला होता. याशिवाय 2014 मध्ये इंचॉनमध्ये कांस्यपदकासाठी दोन्ही संघांमध्ये सामना झाला होता. ज्यामध्ये भारतानं जपानचा 2-1 असा पराभव केला होता. कर्णधार सविता पुनियाच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला हॉकी संघाला उपांत्य फेरीत जागतिक क्रमवारीत दहाव्या क्रमांकावर असलेल्या चीनविरुद्ध 0-4 असा पराभव पत्करावा लागला होता. त्याचवेळी जपानच्या संघानं दक्षिण कोरियाकडून पराभूत होऊन कांस्यपदकावर आपलं नाव कोरलं होतं.

हेही वाचा -

  1. Asian Games २०२३ : चक दे इंडिया! आशियाई स्पर्धेत भारताची सुवर्ण कामगिरी, अंतिम सामन्यात जपानचा धुव्वा उडवला
  2. Cricket World Cup 2023 : विश्वचषक सामन्यापूर्वी 'या' स्टेडियमच्या खेळपट्टीत सुधारणा
  3. Asian Games २०२३ : आशियाई गेम्समध्ये भारताला सुवर्णपदक, उपमुख्यमंत्र्यांनी साधला 'चँपियन'च्या आई-वडिलांशी संवाद

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.