नवी दिल्ली - दिल्लीतील डॉ. कर्णीसिंग नेमबाजी श्रेणीत एक खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. भारतीय क्रीडा प्राधिकरणाने (SAI) ही माहिती दिली. या घटनेनंतर प्रशिक्षण शिबिरात कोणत्याही प्रकारचा अडथळा येणार नसल्याचेही प्राधिकरणाने सांगितले आहे.
दोन महिन्याचे हे प्रशिक्षण शिबिर १५ ऑक्टोबरपासून सुरू झाले असून ते १४ डिसेंबरपर्यंत चालणार आहे. शिबिरात ३२ नेमबाज (१८ पुरुष, १४ महिला), ८ प्रशिक्षक, ३ परदेशी प्रशिक्षक आणि दोन सहाय्यक कर्मचारी यांचा समावेश आहे. कोरोनाची लागण झालेल्या खेळाडूची माहिती दे्ण्यात आलेली नाही.