नवी दिल्ली - आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलेल्या भारताच्या अमित पांघलने विश्व बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक दिली आहे. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात प्रवेश करणारा अमित हा पहिलाच भारतीय खेळाडू ठरला आहे.
हेही वाचा - चीन ओपन : प्रणीत सोबत भारताचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात
हरियाणाच्या अमितने ५२ किलो वजनी गटात खेळताना उपांत्य फेरीत कझाकिस्तानच्या साकेन बिबिसोनोवला ३-२ ने हरवले. शनिवारी होणाऱ्या अंतिम सामन्यात अमितची गाठ रिओ ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक पटकावणाऱ्या शाखोबिदीन जोइरोवशी पडणार आहे.
-
Amit Panghal becomes 1st Indian to reach World Boxing Championships' finals
— ANI Digital (@ani_digital) September 20, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Read @ANI Story | https://t.co/WKtftJm5IU pic.twitter.com/UNzU1ckUhL
">Amit Panghal becomes 1st Indian to reach World Boxing Championships' finals
— ANI Digital (@ani_digital) September 20, 2019
Read @ANI Story | https://t.co/WKtftJm5IU pic.twitter.com/UNzU1ckUhLAmit Panghal becomes 1st Indian to reach World Boxing Championships' finals
— ANI Digital (@ani_digital) September 20, 2019
Read @ANI Story | https://t.co/WKtftJm5IU pic.twitter.com/UNzU1ckUhL
आत्तापर्यंत पुरुषांमध्ये पाच भारतीय बॉक्सिंगपटूंनी विश्व बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये कांस्य पदक पटकावले होते. २००९ मध्ये विजेंदर सिंगने हा पराक्रम केला होता. त्यानंतर २०११ मध्ये विकास कृष्णन आणि २०१५ मध्ये शिवा थापाने उपांत्य सामन्यापर्यंत मजल मारली होती.
२०१७ मध्ये गौरव विधूडीने या स्पर्धेत कांस्तपदक पटकावले होते. या वर्षी मनीष कौशिकने उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती. मात्र, ६३ किलो वजनी गटात क्युबाच्या एंडी क्रूजकडून त्याला पराभव स्विकारावा लागला.