मुंबई - भारतीय धावपटू अमित खत्री याने नैरोबी येथे खेळवण्यात येत असलेल्या अंडर-20 विश्व अॅथलेटिक्स चॅम्पियनशीपमध्ये पदक जिंकलं आहे. अमितने पुरूष 10 हजार मीटर वॉक रेसमध्ये रौप्य पदकाला गवसणी घातली.
अमितने ही रेस 42 मिनिट 17.94 सेंकदात पूर्ण केली. भारताचे या स्पर्धेतील हे दुसरे पदक आहे. याआधी मिक्स्ड रिले 4x400 मीटरमध्ये भारताने कास्य पदक जिंकलं आहे. अमित या कामगिरीसह अंडर-20 विश्व अॅथलेटिक्स चॅम्पियनशीप स्पर्धेत पदक जिंकणारा भारताचा पाचवा खेळाडू ठरला.
-
🇮🇳 Congratulations Amit pic.twitter.com/NOyu0ff4Is
— Athletics Federation of India (@afiindia) August 21, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">🇮🇳 Congratulations Amit pic.twitter.com/NOyu0ff4Is
— Athletics Federation of India (@afiindia) August 21, 2021🇮🇳 Congratulations Amit pic.twitter.com/NOyu0ff4Is
— Athletics Federation of India (@afiindia) August 21, 2021
अमितची या हंगामातील सर्वोत्कृष्ट कामगिरी 40 मिनिट 40.97 सेंकद होती. अमित रेसमध्ये पुढे होता. पण त्याने ड्रिंक टेबलवर अधिक वेळ घालवला. या दरम्यान केनियाचा धावपटू हेरीस्टोन वानयोन्यी त्याच्या पुढे निघून गेला.
केनियाच्या धावपटूने अमित संधी दिली नाही आणि तो सुवर्ण पदकाचा मानकरी ठरला. स्पेनचा पॉल मॅक्ग्रा 42 मिनिट 26.11 सेंकदाचा वेळ घेत कास्य पदकाचा विजेता ठरला.
दरम्यान, भारताने 18 ऑगस्ट रोजी मिक्स्ड रिले 4x400 रेसमध्ये कास्य पदक जिंकत इतिहास रचला. भरत, कपिल, सुमी आणि प्रिया मोहन या चौकडीने 3.20.60 इतका वेळ घेत ऐतिहासिक कामगिरी केली. या इव्हेंटमध्ये नायजेरियाच्या संघाने सुवर्ण तर पोलंडच्या संघाने रौप्य पदक जिंकले.
हेही वाचा - अफगाण फुटबॉलपटूच्या मृत्यू : त्याला पायांनी रचायचा होता इतिहास, पण तालिबानच्या दहशतीने संपले आयुष्य
हेही वाचा - नीरज चोप्राचे नाव पुण्यातील स्टेडियमला देण्यात येणार, राजनाथ सिंह घोषणा करण्याची शक्यता