ETV Bharat / sports

धक्कादायक!.. डोपिंग प्रकरणात सापडले 'खेलो इंडिया युथ गेम्स'मधील १५ खेळाडू - 15 players caught in doping test news

चार वेटलिफ्टर्स, चार कुस्तीपटू, कबड्डीमधील तीन आणि अ‍ॅथलेटिक्स, फुटबॉल, व्हॉलिबॉल आणि बॉक्सिंगमधील खेळाडूंचा यात समावेश आहे. काही खेळाडूंना ही चाचणी करण्यास सांगितले आहे. परंतु लॉकडाऊनमुळे त्यांच्या चाचण्या घेतल्या गेल्या नाहीत.

15 players of khelo India youth games caught in doping test
धक्कादायक!..'खेलो इंडिया युथ गेम्स'मधील १५ खेळाडू डोपिंग प्रकरणात सापडले
author img

By

Published : Apr 21, 2020, 5:41 PM IST

Updated : Apr 21, 2020, 5:59 PM IST

नवी दिल्ली - सरकारच्या योजनांमध्ये प्राधान्य असणार्‍या खेलो इंडिया युथ गेम्समध्ये आतापर्यंतचे सर्वात मोठे डोपिंग प्रकरण समोर आले आहे. १० ते २२ जानेवारी दरम्यान गुवाहाटी येथे आयोजित 'खेलो इंडिया युथ गेम्स' स्पर्धेतील तब्बल १५ खेळाडू डोपिंगप्रकरणात आढळले आहेत. दिल्ली येथे ११ आणि नंतर पुण्यात झालेल्या स्पर्धेतील ९ खेळाडू डोपिंगमध्ये अडकले होते. यातील बहुतेक खेळाडू सुवर्णपदक विजेते आणि अल्पवयीन आहेत. स्टेरॉइडसाठी डोपिंगमध्ये पकडलेल्या खेळाडूंवर नाडाने तात्पुरती बंदी घातली आहे.

चार वेटलिफ्टर्स, चार कुस्तीपटू, कबड्डीमधील तीन आणि अ‍ॅथलेटिक्स, फुटबॉल, व्हॉलिबॉल आणि बॉक्सिंगमधील खेळाडूंचा यात समावेश आहे. काही खेळाडूंना ही चाचणी करण्यास सांगितले आहे. परंतु लॉकडाऊनमुळे त्यांच्या चाचण्या घेतल्या गेल्या नाहीत.

या स्पर्धेतील आतापर्यंतचे सर्वात मोठे डोपिंग प्रकरण -

नाडाकडून एकूण ३४६ डोपिंगचे नमुने घेण्यात आले असून हे नमुने दोहा (कतार) प्रयोगशाळेत चाचणीसाठी पाठवण्यात आले आहेत. क्रीडा मंत्रालय आणि क्रीडा प्राधिकरण यांचा खेलो इंडिया हा प्रमुख कार्यक्रम आहे. लॉकडाऊन उघडल्यानंतरच या खेळाडूंना त्यांचे निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी नाडा सुनावणी पॅनेलसमोर हजर राहण्याची संधी मिळेल.

Last Updated : Apr 21, 2020, 5:59 PM IST

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.