मुंबई - एका मिनिटांमध्ये 432 बॉक्सिंग पंचेस मारणाऱ्या विश्वविक्रम एका 14 वर्षीय मुलाने केला आहे. हर्षवर्धन खाडे असे त्या मुलाचे नाव आहे. त्याचा वर्ल्ड रेकॉर्ड्स बुक ऑफ इंडियाकडून सत्कार करण्यात आला.
हर्षवर्धन खाडे हा मुंबईतील कांदिवली परिसरातील चाळीत राहतो. तो इयत्ता नववीमध्ये शिकत आहे. त्याने एका मिनिटात 432 बॉक्सिंगचे पंच मारत विश्वविक्रम केला. यामुळे हर्षवर्धन खाडेसह त्याचे प्रशिक्षक मनोज गौंड यांचा वर्ल्ड रेकॉर्डस् इंडियाने सर्टिफिकेट आणि मेडल देऊन सत्कार केला. कांदिवलीत पार पडलेल्या या सत्कार सोहळ्याला वर्ल्ड रेकॉर्डस् ऑफ इंडियाचे सीनियर एज्युकेटर संजय नार्वेकर आणि सुषमा नार्वेकर यांच्या उपस्थित होते.
विश्वविक्रम करणाऱ्या हर्षवर्धन खाडेचे प्रशिक्षक मनोज गौंड हे 18 वर्षांहून जास्त काळापासून मुलांना विविध प्रकारचे कराटे मार्शल आर्टचे प्रशिक्षण देत आहेत. वयाच्या पाचव्या वर्षापासून हर्षवर्धनचे स्वप्न होते की, काहीतरी जागतिक स्तरावर वेगळे करून दाखवायचे. ते स्वप्न त्याने एका मिनिटांमध्ये बॉक्सिंगचे 432 पंचेस मारून पूर्ण केले आहे.
हेही वाचा - राशिद खान आणि मोहम्मद नबी IPL 2021 खेळणार का? SRH ने दिलं उत्तर
हेही वाचा - 'गोल्डन बॉय' नीरज चोप्राची सत्काराच्या वेळी तब्येत बिघडली