डुसेलडोर्फ (जर्मनी) - जर्मनीच्या महिला हॉकी संघाने भारताविरुद्धचा पहिला सामना ५-० ने जिंकला आणि चार सामन्याच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली.
जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानी असलेल्या यजमान संघाने पहिल्या सत्रात २-० ने बढत घेतली होती. पिया मर्टेसने १० व्या आणि १४ व्या मिनिटाला गोल केलं. दुसऱ्या सत्रात देखील जर्मनीचे वर्चस्व राहिले. त्यांच्या खेळाडूंनी दुसऱ्या सत्रात आणखी दोन गोल करत आघाडी ४-० ने वाढवली. लिना मिशेलने २० व्या तर पॉलिन हेंज हिने २८ व्या मिनिटाला गोल केला.
लिसा अल्टेनबर्गने तिसऱ्या सत्रात ४१ व्या मिनिटाला गोल करत जर्मनीला ५-० ने आघाडी मिळवून दिली. चौथ्या सत्रात यजमान संघाला भारतीय संघाने गोल करू दिला नाही. जर्मनीने अखेरीस हा सामना ५-० ने जिंकला. उभय संघातील दुसरा सामना उद्या रविवारी खेळला जाणार आहे.
हेही वाचा - Exclusive: माजी हॉकीपटू धनराज पिल्ले यांच्याशी नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियम विषयावरुन खास बातचित
हेही वाचा - ओडिशात उभे राहत आहे देशातील सर्वात मोठे हॉकी स्टेडियम