मुंबई - हॉकी इंडियाने आगामी इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी १८ सदस्यीय भारतीय संघाची घोषणा केली आहे. या मालिकेसाठी राणी रामपालकडे टीम इंडियाचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहेत. हे सर्व सामने २७ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबरदरम्यान खेळवले जाणार आहेत.
![rani rampal](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/d-pjn3wuwaiexsd_1309newsroom_1568375675_931.jpg)
हेही वाचा - तीन मुलांची आई किम क्लाइस्टर्स टेनिसच्या मैदानावर परतणार
पाच सामन्यांच्या या मालिकेसाठी गोलकीपर सविता हिला उपकर्णधारपद दिले गेले आहे. भारताचे मुख्य प्रशिक्षक शुअर्ड मरेन यांनी सांगितले, '२०२० मध्ये होणाऱ्या टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. इंग्लंडला रवाना होण्यापूर्वी आम्ही दहा दिवस येथे सराव करणार आहोत. आम्हाला आशा आहे की नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या अमेरिकाविरुद्धच्या एफआईएच हॉकी ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेसाठी आम्ही तयार असू.'
-
Captain Cool @imranirampal should soon start imparting life lessons on how to stay calm under tense situations! #IndiaKaGame #Tokyo2020 #RoadToTokyo #GiftOfHockey@Tokyo2020 @Olympics @FIH_Hockey pic.twitter.com/he30GshbMM
— Hockey India (@TheHockeyIndia) September 12, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Captain Cool @imranirampal should soon start imparting life lessons on how to stay calm under tense situations! #IndiaKaGame #Tokyo2020 #RoadToTokyo #GiftOfHockey@Tokyo2020 @Olympics @FIH_Hockey pic.twitter.com/he30GshbMM
— Hockey India (@TheHockeyIndia) September 12, 2019Captain Cool @imranirampal should soon start imparting life lessons on how to stay calm under tense situations! #IndiaKaGame #Tokyo2020 #RoadToTokyo #GiftOfHockey@Tokyo2020 @Olympics @FIH_Hockey pic.twitter.com/he30GshbMM
— Hockey India (@TheHockeyIndia) September 12, 2019
मरेन पुढे म्हणाले, 'आता आम्ही इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी तयारी करत आहोत. परंतू आमचा मुख्य उद्देश छोटया चुका टाळून सर्वोत्तम कामगिरी करण्यावर असेल.'
संघ :
गोलकीपर - सविता (उपकर्णधार), रजनी इतिमारपू.
डिफेंडर्स - दीप ग्रेस ईक्का, गुरजीत कौर, रीना खोखर, सलीमा टेटे.
मिडफील्डर - सुशीला चानू पुखरंबम, निक्की प्रधान, मोनिका, नेहा गोयल, लिलिमा मिंज, नमिता टोप्पो.
फॉरवर्ड - राणी रामपाल (कर्णधार), वंदना कटारिया, नवनीत कौर, लालरेमसियामी, नवजोत कौर आणि शर्मिला देवी.