मुंबई - भारतीय महिला हॉकी संघाची कर्णधार राणी रामपाल आणि संघातील सहा खेळाडूंसह दोन स्टाफ सदस्यांनी कोरोनावर मात केली आहे.
राणी रामपाल, सविता पूनिया, शर्मिला देवी, रजनी, नवज्योत कौर, नवनीत कौर आणि सुशिला या खेळाडूंना कोरोनाची लागण झाली होती. तसेच संघाचे व्हिडिओ विश्लेषक अमृतप्रकाश आणि सल्लागार वेन लोम्बार्ड यांना देखील कोरोना झाला होता.
सर्वजण बंगळुरू येतील भारतीय खेळ प्राधिकरण (साई) केंद्रात क्वारंटाईन होते. तिथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारानंतर सर्व जणांनी कोरोनावर मात केली आहे.
राणीने कोरोनावर मात केल्यानंतर ट्विट केलं आहे. त्यात तिने म्हटलं आहे की, 'मागील दोन आठवड्यादरम्यान अनेकांनी फोन तसेच मॅसेज करत आम्हा धैर्य दिलं. त्याबद्दल त्यांचे मी आभार मानते. मी आणि माझ्या संघातील खेळाडू कोरोनातून सावरत आहोत.'
राणीने देशावासियांना अशा कठिण काळात गरजूंना मदत करण्याचे देखील आवाहन केले आहे.
हेही वाचा - 'देशाअंतर्गत स्पर्धेत चांगले प्रदर्शन करत होतो, पण प्रसिद्धी IPLमुळे मिळाली'
हेही वाचा - हार्दिकला इंग्लंड दौऱ्यातून वगळलं, माजी निवडकर्ते प्रसाद म्हणाले...