मुंबई - सुलतान अझलान शाह चषकाच्या तयारीसाठी हॉकी इंडियाने शिबीराचे आयोजन केले आहे. त्या पार्श्वभूमीवर शनिवारी वरिष्ठ संघाच्या ३४ खेळाडूंची घोषणा केली. १८ फेब्रुवारीपासून बेंगळुरू येथे या शिबीराला सुरूवात होणार आहे. शाह चषकाची ही स्पर्धा २३ मार्चपासून सुरू होणार आहे.
हॉकी इंडियाने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये झालेल्या विश्वचषकात सहभागी असलेल्या १८ खेळाडूंची या शिबिरासाठी निवड केली आहे. महिनाभर चालणाऱ्या या शिबिरासाठी जोहोर कपमध्ये रजत पदक विजेत्या संघातील खेळाडू शिलानंद लकडा, सुमन बेक, मनदीप मोर, यशदीप सिवाच, विशाल अंतिल आणि गुरसाहबजीत सिंह यांना निवडले आहे. फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात संघाची निवड होणार आहे.
शिबिरासाठी निवडण्यात आलेलेल खेळाडू-
गोलकीपर: पीआर श्रीजेश, सूरज करकेरा, कृष्ण बहादुर पाठक
डिफेंडर: हरमनप्रीत सिंह, गुरिंदर सिंह, वरुण कुमार, कोथाजीत सिंह, सुरेंद्र कुमार, अमित रोहिदास, जरमनप्रीत सिंह, प्रदीप सिंह, सुमन बेक, मनदीप मोर, बीरेंद्र लकडा, रूपिंदर पाल सिंह
मिडफील्डर: मनप्रीत सिंह, चिंगलेनसना सिंह कंगुजम, सुमित, सिमरनजीत सिंह, नीलकांत शर्मा, हार्दिक सिंह, ललित कुमार उपाध्याय, विवेक सागर प्रसाद, यशदीप सिवाच, विशाल अंतिल
फॉरवर्ड: आकाशदीप सिंह, रमनदीप सिंह, गुरजंत सिंह, मनदीप सिंह, दिलप्रीत सिंह, सुमित कुमार, गुरसाहबजीत सिंह, शिलानंद लकड़ा, एस वी सुनील