नवी दिल्ली - टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघाने कांस्य पदक जिंकले आहे. ऑलिम्पिकमध्ये हॉकीच्या कांस्यपदकाच्या लढतीत जर्मनीला ५-४ने हरवून भारताने ४१ वर्षानंतर इतिहास रचला आहे. भारतीय हॉकीच्या सुवर्ण युगाचा पुन्हा प्रारंभ झाला असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले. दरम्यान, हा विजय देशाचा असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खेळाडूंचे मनोबल वाढवल्याने हा विजय शक्य झाल्याचे हॉकीचे जादूगार असलेले मेजर ध्यानचंद यांचा मुलगा अशोक कुमार यांनी सांगितले आहे.
हेही वाचा - ETV BHARAT VIDEO: हॉकी खेळाडू शमशेर सिंगच्या घरातील जल्लोष
'ई टीव्ही भारत'सोबत बोलताना अशोक कुमार यांनी मेजर ध्यानचंद यांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. स्वातंत्र्यपूर्व भारत ते स्वातंत्र्यानंतरच्या भारतातील खेळांबद्दल अशोक कुमार यांनी भाष्य केले. तसेच टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघाने मिळवलेल्या यशाबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला व संघाचे अभिनंदन केले.
पंतप्रधानांनी केले भारतीय हॉकी संघाचे कौतूक -
भारतीय पुरूष हॉकी संघाने टोकियो ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचला. कर्णधार मनप्रीत सिंगच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारतीय संघाने जर्मनीचा 5-4 ने पराभव करत कांस्य पदक जिंकलं. यासह भारतीय संघाने 41 वर्षांचा पदकाचा दुष्काळ संपवला. देशभरात या विजयानंतर जल्लोष साजरा केला जात आहे. या दरम्यान, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय कर्णधार मनप्रीत सिंग याच्याशी फोनवर बातचीत केली. पंतप्रधान मोदी म्हणाले, मनप्रीत जी, खूप खूप शुभेच्छा. तुम्ही आणि तुमच्या संघाने चांगलं काम केलं आहे. तुम्हा सर्वाचे कष्ट काम करत आहे. तुमच्या प्रशिक्षकांनी देखील यासाठी खूप मेहनत घेतली आहे. माझ्याकडून सर्व खेळाडूंना शुभेच्छा दे भावा. 15 ऑगस्ट रोजी आपण सगळे जण भेटू यासाठी मी सर्वांना आमंत्रण दिलं आहे.
हेही वाचा - भाऊ सर्वांना शुभेच्छा सांग! पंतप्रधान मोदींचा भारतीय हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीतला फोन