दोहा - 2022च्या फिफा वर्ल्ड कपसाठी तयार करण्यात आलेले तिसरे स्टेडियम कतारने देशाला समर्पित केले. या प्रसंगी कोरोनादरम्यान स्टेडियमच्या बांधकामात योगदान देणार्या कामगारांच्या योगदानाची आठवण काढण्यात आली. काही दिवसांपूर्वी, डिलिव्हरी अँड लीगेसी अँड कतार फाऊंडेशनच्या सर्वोच्च समितीने 2022च्या फिफा वर्ल्ड कप कतारसाठी तिसर्या स्टेडियमचे बांधकाम पूर्ण झाल्याचे जाहीर केले होते.
हा उद्घाटन सोहळा सुप्रीम कमिटी फॉर डिलिव्हरी अँड लेगसीच्या (एससी) सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही प्रसारित केला गेला. या उद्घाटनावेळी कतार राज्याने ठरवलेल्या सर्व सुरक्षा मानकांचे पालन केले गेले.
सुमारे 40 हजार प्रेक्षकांची क्षमता असलेल्या या स्टेडियमला 'डायमंड इन डेजर्ट' असे नाव देण्यात आले आहे. हे स्टेडियम कतार फाऊंडेशन एज्युकेशन सिटीमध्ये आहे. स्टेडियमला ग्लोबल टिकाऊ मूल्यमापन प्रणाली अंतर्गत पंचतारांकित रेटिंग प्राप्त झाले आहे. असे रेटिंग प्राप्त करणारे हे वर्ल्डकपचे पहिले स्टेडियम आहे.
एस.सी.चे सरचिटणीस एच.ई. हसन अल थावेदी म्हणाले, "एज्युकेशन सिटी स्टेडियमचे कामकाज हा एक मैलाचा दगड आहे. आता आम्ही मध्य-पूर्व आणि अरब देशांमध्ये प्रथम फिफा वर्ल्डकप आयोजित करण्याच्या दिशेने चाललो आहोत."
एज्युकेशन सिटी मधील पूर्ण होणारे हे कतारमधील तिसरे स्टेडियम आहे. यापूर्वी 2017 मध्ये खलीफा आंतरराष्ट्रीय स्टेडियम आणि 2019 मध्ये अल जानोब स्टेडियमचे काम पूर्ण झाले होते.