ETV Bharat / sports

कोरोनाग्रस्तांसाठी रोनाल्डोचा पुढाकार; पोर्तुगालमधील हॉटेल्स उपचारांसाठी केली खुली

author img

By

Published : Mar 15, 2020, 4:11 PM IST

जागतिक आरोग्य संघटनेने आरोग्य आणीबाणीची घोषणा केली असून प्रत्येक देश आपआपल्यापरीने उपाययोजनेसाठी एकवटले आहेत. अशात पोर्तुगालचा फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोनेही कोरोनाविरुद्धच्या लढाईसाठी पुढाकार घेतला आहे.

Ronaldo to turn hotels into hospitals
कोरोनाग्रस्तांसाठी रोनाल्डोचा पुढाकार; पोर्तुगालमधील हॉटेल्स उपचारांसाठी केली खुली

मुंबई - कोरोना विषाणूने जगभरात हाहाकार माजला आहे. या विषाणूमुळे जगभरातील ६ हजार लोकांना आपला प्राण गमवावा लागला आहे. धोक्याची बाब म्हणजे, दिवसागणिक हा आकडा वाढतच चालला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने आरोग्य आणीबाणीची घोषणा केली असून प्रत्येक देश आपआपल्यापरीने उपाययोजनेसाठी एकवटले आहेत. अशात पोर्तुगालचा फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोनेही कोरोनाविरुद्धच्या लढाईसाठी पुढाकार घेतला आहे.

रोनाल्डोने जगभरातील आपल्या चाहत्यांना कोरोना विषाणूशी लढण्यासाठी योग्य ती काळजी घेण्याचे आव्हान केले आहे. त्यासोबतच त्याने पोर्तुगालमधील त्याच्या सर्व हॉटेल्सचे रुपांतर हॉस्पिटलमध्ये केले आहे. त्या हॉस्पिटलमध्ये कोरोना विषाणूने संक्रमित असलेल्यांवर मोफत उपचार केले जाणार असल्याचाही निर्णय त्याने घेतला आहे. एवढेच नव्हे, तर येथे उपचार देणाऱ्या डॉक्टर आणि नर्स यांचा पगारही रोनाल्डो स्वतःच्या खिशातून करणार आहे.

  • OFFICIAL: Cristiano Ronaldo is turning his chain of hotels in Portugal into hospitals to treat those with underlying health conditions who have Coronavirus.

    Their treatment will be FREE as @Cristiano will be paying for everything, including salaries of doctors & nurses.

    👏👏👏 pic.twitter.com/ofumQFfXJj

    — Footy Accumulators (@FootyAccums) March 15, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

दरम्यान, रोनाल्डो सद्या सीरी ए लीग रद्द झाल्यामुळे मायदेशात आपल्या कुटुंबीयांसोबत आहे. कोरोना विषयावरून त्यानं, आज जग कठीण प्रसंगातून जात आहे. अशावेळी प्रत्येकाने स्वतःची नेहमीपेक्षा अधिक काळजी घेणे गरजेची आहे. मी आज तुमच्याशी एक फुटबॉलपटू म्हणून नव्हे, तर एक मुलगा, एक बाप म्हणून संवाद साधत आहे. मी सर्वांना विनंती करतो की जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) केलेल्या सूचनांचे पालन करा. असे आवाहन त्याने केले आहे.

हेही वाचा - कोरोनाचा राग चीनवर..! भडकलेला शोएब म्हणाला.. तुम्ही वटवाघुळं, कुत्रे कसं खाऊ शकता?

हेही वाचा - 'आता घरी बसण्याची वेळ', कोरोनामुळे मेस्सी चिंताग्रस्त

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.