नवी दिल्ली - चेल्सी या आघाडीच्या फुटबॉल क्लबचा खेळाडू कॅलम हडसन-ओडोईला कोरोनीची लागण झाल्यानंतर अजून एक फुटबॉलपटू या गंभीर आजारात सापडला आहे. दिग्गज फुटबॉलपटू खिस्तियानो रोनाल्डोचा संघ सहकारी डॅनियन रुगानीला कोरोना झाला असल्याचे समोर आले आहे.
हेही वाचा - संजय मांजरेकरांची हकालपट्टी! ..बीसीसीआयचा निर्णय
रुगानीच्या कोरोना चाचणी अहवाल 'पॉझिटीव्ह' आला आहे. त्यामुळे रूगानीशी संबंध आलेल्या लोकांचा शोध सुरू करण्यात आला आहे. रोनाल्डो आणि डॅनियल दोघेही जुव्हेंटस क्लबकडून खेळतात. त्यांना विशेष देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. तथापी, रोनाल्डो सध्या पोर्तुगालमध्ये आहे. या साथीमुळे इटलीमध्ये ८२७ लोक ठार झाले आहेत, तर सुमारे १२ हजार लोकांना संसर्ग झाला आहे.
चेल्सीचा कॅलम हडसन-ओडोई हा कोरोनाची लागण झालेला प्रीमियर लीगचा पहिला खेळाडू ठरला आहे. शिवाय, अर्सेनाल या फुटबॉल क्लबच्या मुख्य प्रशिक्षकांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. मायकेल अर्टेरा असे या प्रशिक्षकाचे नाव आहे.