माद्रिद - विक्रमी १३ वेळचा विजेता आणि सलग ३ वेळा स्पर्धा जिंकणारा एकमेव क्लब रिअल माद्रिद चॅम्पियन्स लीग स्पर्धेबाहेर झाला आहे. परतीच्या लढतीत एजाक्स विरुद्ध झालेल्या सामन्यात रिअल माद्रिदचा ४-१ अशा फरकाने दारुण पराभव झाला. २०१५ नंतर रिअलचा पहिल्यांदाच उपउपांत्यपूर्व फेरीत पराभव झाला आहे.
1-4: Holders bow out of the Champions League.https://t.co/G9lcMrwHxv
— Real Madrid C.F. 🇬🇧🇺🇸 (@realmadriden) March 6, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">1-4: Holders bow out of the Champions League.https://t.co/G9lcMrwHxv
— Real Madrid C.F. 🇬🇧🇺🇸 (@realmadriden) March 6, 20191-4: Holders bow out of the Champions League.https://t.co/G9lcMrwHxv
— Real Madrid C.F. 🇬🇧🇺🇸 (@realmadriden) March 6, 2019
पहिल्या फेरीच्या लढतीत रिअलने २-१ असा विजय मिळवला होता. परंतु, परतीच्या लढतीत घरच्या मैदानावर खेळणाऱया रिअलला याचा फायदा घेता आला नाही. एजाक्स संघाने पहिल्या २० मिनिटात २ गोल केले. ७व्या मिनिटाला एच. झियेक आणि १८ मिनिटाला डेव्हिड नेरेसने गोल करत एजाक्सला २-० अशी आघाडी मिळवून दिली. पहिल्या सत्रात रिअलला गोल करण्यात अपयश आले.
FT: @realmadrid 1-4 @AFCAjax (agg. 3-5)
— Real Madrid C.F. 🇬🇧🇺🇸 (@realmadriden) March 5, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
⚽ @marcoasensio10 70'; Ziyech 7', Neres 18', Tadic 66', Schöne 72'#RMUCL pic.twitter.com/GBnbzD6kj7
">FT: @realmadrid 1-4 @AFCAjax (agg. 3-5)
— Real Madrid C.F. 🇬🇧🇺🇸 (@realmadriden) March 5, 2019
⚽ @marcoasensio10 70'; Ziyech 7', Neres 18', Tadic 66', Schöne 72'#RMUCL pic.twitter.com/GBnbzD6kj7FT: @realmadrid 1-4 @AFCAjax (agg. 3-5)
— Real Madrid C.F. 🇬🇧🇺🇸 (@realmadriden) March 5, 2019
⚽ @marcoasensio10 70'; Ziyech 7', Neres 18', Tadic 66', Schöne 72'#RMUCL pic.twitter.com/GBnbzD6kj7
ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि प्रशिक्षक झिनेदिन झिदान यांनी क्लबला सोडचिठ्ठी दिल्यानंतर रिअलला चांगली कामगिरी करण्यात अपयश आले आहे. संघाला यावर्षी एकही मोठी स्पर्धा जिंकता आली नाही. मागील ५ सामन्यात रिअलला ४ वेळा पराभवाला सामोरे जावे लागले आहे. २००४ नंतर संघाला प्रथमच रिअलला सलग ४ वेळा पराभवाला सामोरे जावे लागले आहे. कोपा डेल रे आणि ला लीगामध्ये संघाला पारंपरिक प्रतिस्पर्धा बार्सिलोनाविरुद्ध पराभव झाला होता.