पोर्तुगाल - युएफा नेशन्स लीग स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या पोर्तुगाल संघाने नेदरलँड्सवर १-० ने विजय मिळवत किताब आपल्या नावावर केला आहे. अंतिम सामन्यात पोर्तुगालसाठी मिडफील्डर गोनकालो गुएडेस ६०व्या मिनीटाला एकमात्र गोल करत पोर्तुगालला युएफा नेशन्स लीगच्या पहिल्या सत्रातील विजेतेपद पटकावून दिले.
युएफा नेशन्स लीगस्पर्धेच्या उपांत्य सामन्यात ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या हॅट्ट्रीकच्या जोरावर पोर्तुगालने स्वित्झर्लंडचा ३-१ असा पराभव करत अंतिम फेरी गाठली होती. गेल्या ३ वर्षात प्रथमत पोर्तुगालच्या संघाने आंतरराष्ट्रीय स्पर्धा आपल्या नावावर केली आहे. पोर्तुगालने शेवटचा किताब हा २०१६ मध्ये युरोपियन अजिंक्यपद स्पर्धा जिंकून मिळवला होता.
युरोपियन फुटबॉल असोसिएशनच्या (युएफा) मान्यतेने खेळण्यात येणाऱ्या युएफा नेशन्स लीग स्पर्धेचे हे पहिलेच सत्र होते.