पॅरिस - चॅम्पियन्स लीगच्या अंतिम-१६ च्या फेरीत पॅरिसला धक्कादायक पराभवाला सामोर जावे लागले. पराभवासह चॅम्पियन्स लीग जिंकण्याचे पॅरिसचे स्वप्न धुळीस मिळाले. मॅनचेस्टर युनायटेडकडून रोमेलू लुकाकुने २ गोल करत संघाच्या विजयात महत्वाचे योगदान दिले.
AND THAT'S THAT!#MUFC book our place in the #UCL quarter-finals in the most dramatic fashion thanks to @MarcusRashford's injury-time penalty! pic.twitter.com/yXzWISgoJZ
— Manchester United (@ManUtd) March 6, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">AND THAT'S THAT!#MUFC book our place in the #UCL quarter-finals in the most dramatic fashion thanks to @MarcusRashford's injury-time penalty! pic.twitter.com/yXzWISgoJZ
— Manchester United (@ManUtd) March 6, 2019AND THAT'S THAT!#MUFC book our place in the #UCL quarter-finals in the most dramatic fashion thanks to @MarcusRashford's injury-time penalty! pic.twitter.com/yXzWISgoJZ
— Manchester United (@ManUtd) March 6, 2019
अंतिम-१६ च्या पहिल्या फेरीत युनायटेडच्या घरच्या मैदानावर पॅरिसने २-१ ने विजय मिळवला होता. स्टार खेळाडू नेमारच्या अनुपस्थितीत खेळणाऱ्या पॅरिसला घरच्या मैदानावर खेळताना १ गोलची महत्वपूर्ण आघाडी होती. दोन्ही संघांनी सामन्याच्या सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ केला. मॅनचेस्टरकडून रोमेलू लुकाकूने दुसऱयाच मिनिटाला गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली. तर, पॅरिसकडून जुआन बर्नाटने १२ व्या मिनिटाला गोल करत संघाला १-१ अशी बरोबरी साधून दिली. सामन्याच्या ३० व्या मिनिटाला पॅरिसचा गोलकिपर बुफॉनकडून झालेल्या चुकीचा फायदा घेत लुकाकूने दुसरा गोल करत संघाला २-१ अशी आघाडी मिळवून दिली.
सामन्याच्या दुसऱ्या सत्राच्या अतिरिक्त वेळेत मॅनचेस्टरने पेनल्टी किकवर गोल केला. यासह मॅनचेस्टरने ३-१ अशा फरकाने विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरीतील प्रवेश निश्चित केला. पॅरिसला सलग दुसऱ्या वर्षी अंतिम-१६ मधूनच स्पर्धेबाहेर व्हावे लागले आहे.