कोलकाता - खेळाडू, प्रशिक्षक आणि क्रीडा कर्मचाऱ्यांची थकबाकी भरली असल्याचे फुटबॉल क्लब मोहन बागानने मंगळवारी सांगितले. क्लबने एका निवेदनात ही माहिती दिली. ''मोहन बागान फुटबॉल क्लब (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेडने भारतीय प्रशिक्षक, खेळाडू आणि सहाय्यक कर्मचार्यांचा थकबाकी पगार दिला आहे. मोहन बागान एफसीने आपली वचनबद्धता व्यक्त केली आहे. खेळाडू, प्रशिक्षक आणि सहाय्यक कर्मचार्यांना यशस्वी भविष्यासाठी क्लब शुभेच्छा देतो."
थकबाकीच्या मागणीसाठी खेळाडूंनी मे महिन्यात क्लबला पत्र लिहिले होते. चार फेऱ्या बाकी असताना मोहन बागानने आय-लीगचे विजेतेपद जिंकले. हा क्लब आता इंडियन सुपर लीग (आयएसएल) टीम एटीकेमध्ये विलीन झाला आहे. मोहन बागान क्लबचे 80 टक्के भागीदारी असलेले अध्यक्ष संजीव गोयंका यांच्या नेतृत्वात 10 जुलै रोजी मंडळाची बैठक होणार असून त्यामध्ये क्लबचे नाव, जर्सी आणि लोगो निश्चित होईल.
मोहन बागानने कोरोना विरूद्धच्या लढाईसाठी 20 लाख रुपयांची मदत जाहीर केली होती. वैद्यकीय कर्मचारी आणि रुग्णालयांना मदत करण्यासाठी हा निधी देण्यात आला आहे.