कोलकाता - युवा भारती क्रीडांगणा जवळील मेट्रो स्टेशनला 'भारतीय फुटबॉल असोसिएशन (आयएफए) सॉल्ट लेक स्टेडियम' असे नाव देण्यात आले आहे. इतिहासात प्रथमच देशातील एखाद्या क्रीडा संघटनेचे नाव मेट्रो स्टेशनशी जोडण्यात आले आहे. याबद्दल आयएफएचे सचिव जयदीप मुखर्जी यांनी कोलकाता मेट्रो रेल कॉर्पोरेशन (केएमआरसी) चे आभार मानले. ते म्हणाले, "खेळाच्या भागधारकांसाठीही हा मोठा सन्मान म्हणून आम्ही पाहतो. हे आमचे शहर आहे, हा आमचा खेळ आहे."
-
#KolkataMetro station named after #IndianFootballAssociation! https://t.co/XYRacWfyjQ
— Arunava Chaudhuri (@Arunfoot) October 8, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#KolkataMetro station named after #IndianFootballAssociation! https://t.co/XYRacWfyjQ
— Arunava Chaudhuri (@Arunfoot) October 8, 2020#KolkataMetro station named after #IndianFootballAssociation! https://t.co/XYRacWfyjQ
— Arunava Chaudhuri (@Arunfoot) October 8, 2020
ते म्हणाले, "मी केएमआरसी आणि पश्चिम बंगाल यांच्या पाठिंब्याबद्दल आभार मानतो. महान लोक आणि ज्यांनी भारतीय फुटबॉलला पुढे नेले आहे त्यांना ही श्रद्धांजली आहे. स्थानकाचे नाव फुटबॉलशी जोडले जाणे, ही देशाच्या फुटबॉलसाठी ही अभिमानाची बाब आहे. "
१८९३ मध्ये बनलेली भारतीय फुटबॉल असोसिएशन ही देशातील सर्वात जुनी फुटबॉल संघटना आहे. ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनचे (एआयएफएफ) सिनियर उपाध्यक्ष सुब्रत दत्ता म्हणाले, "अनेक दशकांपासून लोक स्टेडियमवर पोहोचण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीचा वापर करत आहेत. आयएफए सॉल्ट लेक स्टेडियमचे स्थानकामुळे चाहत्यांना हे आपलेसे वाटेल. मी ही एक वेगळी मोहीम म्हणून पाहत आहे, जी चाहत्यांना अधिकाधिक फुटबॉलमध्ये गुंतवेल.''