ETV Bharat / sports

टोटेनहॅमला नमवत लिव्हपूरलने उंचावला चॅम्पियन्स लीगचा चषक - युएफा

लिव्हरपूलने धडाकेबाज कामगिरी करताना टोटेनहॅमला हॉटस्परला २-० गोलफरकाने हरवत चॅम्पियन्स लीगचा किताब पटकावला. लिव्हरपूलसाठी चॅम्पियन्स लीगचे हे सहावे विजेतेपद ठरले. याआधी त्यांनी १९७७, १९७८, १९८१, १९८४ आणि २००५ साली युरोपियन स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते.

लिव्हरपूल फुटबॉल क्लब
author img

By

Published : Jun 2, 2019, 5:02 PM IST

माद्रिद - लिव्हरपूर आणि टोटेनहॅम हॉटस्पर यांच्यात झालेल्या युएफा चॅम्पियन्स लीगचा अंतिम सामना रंगला होता. लिव्हरपूलने धडाकेबाज कामगिरी करताना टोटेनहॅमला हॉटस्परला २-० गोलफरकाने हरवत चॅम्पियन्स लीगचा किताब पटकावला. २००५ सालानंतर लिव्हरपूलने तब्बल १४ वर्षानंतर चषकावर नाव कोरले आहे.

युएफा चॅम्पियन्स लीगच्या अंतिम सामन्यात लिव्हरपूल आणि टोटेनहॅम हॉटस्पर हे २ इंग्लीश प्रीमिअर लीगचे संघ एकमेकांसमोर होते. लिव्हरपूलने सामन्याच्या सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ केला. याचा फायदा त्यांना दुसऱ्याच मिनिटाला झाला. टोटेनहॅमच्या खेळाडून पेनल्टी भागात हाताने चेंडू अडवल्याने लिव्हरपूलला पेनल्टी किक मिळाली. याचा फायदा घेताना लिव्हरपूलचा आघाडीचा खेळाडू मोहम्मद सलाहने कोणतीही चूक न करता गोल करत संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. चॅम्पियन्स लीगच्या अंतिम सामन्यात गोल करणारा मोहम्मद सलाह इजिप्तचा पहिला खेळाडू ठरला. पहिल्या सत्रात दोन्ही संघाकडून आक्रमक खेळ झाला. परंतु, गोल करण्यात दोन्ही संघांना अपयश आले.

दुसऱया सत्राच्या सुरुवातीपासूनच टोटेनहॅमने चेंडूवर बराच वेळ ताबा मिळवला होता. परंतु, त्यांना गोल करण्याची संधी मिळाली नाही. टोटेनहॅमचे आक्रमण लिव्हरपूलचा गोलरक्षक अॅलिसन बेकरने यशस्वीरित्या थोपवले. त्याला, व्हर्जिल वॅन डिजीक आणि इतर बचावपटूंनी उत्तम साथ दिली. शेवटच्या १५ मिनिटात टोटेनहॅमने अनेक चाली रचत लिव्हरपूलवरती दबाव आणला होता. परंतु, प्रतिआक्रमण करत असताना मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरवर डी. ओरेगीने लिव्हरपूलसाठी ८७ मिनिटाला दुसरा गोल करत लिव्हरपूलचा विजय निश्चित केला.

लिव्हरपूलसाठी चॅम्पियन्स लीगचे हे सहावे विजेतेपद ठरले. याआधी त्यांनी १९७७, १९७८, १९८१, १९८४ आणि २००५ साली युरोपियन स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते. प्रीमिअर लीगमध्येही २०१८-१९ च्या हंगामात लिव्हरपूलने चांगली कामगिरी करताना ९७ गुणांसह दुसरे स्थान पटकावले होते.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.