इंग्लंड - चॅम्पियन्स लीग स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या दुसऱ्या लेगमध्ये झालेल्या सामन्यात लिव्हरपूलने बार्सिलोनाचा ४-० असा धुव्वा उडवत एकतर्फी विजय साजरा केला. या पराभवासह मेस्सीच्या बार्सिलोनालाचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. तर लिव्हरपूलने मोठ्या थाटात अंतिम फेरीत धडक मारली आहे.
बार्सिलोनाने पहिल्या लेगमध्ये लिव्हरपूलला ३-० ने पराभूत केले होते. त्याची परतफेड लिव्हरपूलने दुसऱ्या लेगमध्ये ४-० ने दणदणित विजय साजरा करत केली. लिव्हरपूलसाठी डिवोक ओरिगीने आणि जॉर्जिनिओ प्रत्येकी २ गोल दागत संघाला अविश्वसनीय विजय मिळवून दिला.
लिव्हरपुलने सलग दुसऱ्या वर्षी चॅम्पियन्स लीगची अंतिम फेरी गाठली आहे. अंतिम फेरीत लिव्हरपूलचा सामना अजॅक्स आणि टॉटेनहॅम यांच्यातील विजयी संघाशी होणार आहे.