नवी दिल्ली - ला-लिगा फुटबॉल स्पर्धेत बार्सिलोनाने अॅथलेटिक बिलबाओ क्लबवर २-१ असा विजय मिळवला. या सामन्यात बार्सिलोनाचा दिग्गज फुटबॉलपटू मेस्सीने बार्सिलोनासाठी विक्रमी ६५०वा गोल नोंदवला. काही दिवसांपूर्वी, याच संघाविरुद्ध खेळताना मेस्सीला कारकीर्दीत प्रथमच लाल कार्ड दाखवण्यात आले होते.
स्पॅनिश सुपर चषक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात अॅथलेटिक क्लबने बार्सिलोनावर ३-२ अशी मात केली होती. याच पराभवाचा वचपा बार्सिलोनाने रविवारी मध्यरात्री काढला. या विजयासह बार्सिलोनाने गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी झेप घेतली.
-
👑 Leo #Messi: 6️⃣5️⃣0️⃣ gols com a camisa do Barça! 💙❤️ pic.twitter.com/ZH6eBh8bVc
— FC Barcelona (@fcbarcelona_br) February 1, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">👑 Leo #Messi: 6️⃣5️⃣0️⃣ gols com a camisa do Barça! 💙❤️ pic.twitter.com/ZH6eBh8bVc
— FC Barcelona (@fcbarcelona_br) February 1, 2021👑 Leo #Messi: 6️⃣5️⃣0️⃣ gols com a camisa do Barça! 💙❤️ pic.twitter.com/ZH6eBh8bVc
— FC Barcelona (@fcbarcelona_br) February 1, 2021
हेही वाचा - इंग्लंडला कमी लेखण्याची चूक करू नका, भारतीय माजी क्रिकेटपटूची टीम इंडियाला ताकीद
घरच्या मैदानावर खेळणाऱ्या ३३ वर्षीय मेसीने २०व्या मिनिटाला फ्री-कीकद्वारे पहिला गोल नोंदवला. त्यानंतर जॉर्डी अल्बाने (४९ मि.) स्वयंगोल केल्यामुळे अॅथलेटिक क्लबने बरोबरी साधली. मात्र अॅन्टोइन ग्रीझमनने ७४व्या मिनिटाला दुसरा गोल नोंदवून बार्सिलोनाचा विजय साकारला. र्सिलोनाचे या विजयासह २० सामन्यांतून ४० गुण झाले आहेत. अॅटलेटिको माद्रिद १९ सामन्यांतील ५० गुणांसह गुणतालिकेच्या अग्रस्थानी विराजमान आहे.