ETV Bharat / sports

फिफा क्रमवारी : भारतीय महिला संघाला दोन स्थानांचा फायदा

भारतीय संघाव्यतिरिक्त व्हेनेझुएलानेही दोन स्थानांची कमाई केली असून ते ५५व्या क्रमांकावर पोहोचले आहेत. २१९२ गुणांसह अमेरिका अव्वल स्थानावर आहे. त्यांच्यापाठोपाठ दुसर्‍या क्रमांकावर जर्मनी, तिसर्‍या क्रमांकावर फ्रान्स आणि चौथ्या क्रमांकावर नेदरलँड्स आहे.

Indian women's team in latest FIFA rankings
फिफा क्रमवारी : भारतीय महिला संघाला दोन स्थानांचा फायदा
author img

By

Published : Dec 19, 2020, 6:42 AM IST

ज्यूरिख - फिफाने जाहीर केलेल्या ताज्या जागतिक क्रमवारीत भारतीय महिला फुटबॉल संघाला दोन स्थानांचा फायदा झाला आहे. सध्या भारतीय संघ या क्रमवारीत ५३व्या स्थानी आहे. यापूर्वी, १४ ऑगस्टला जाहीर झालेल्या फिफाच्या क्रमवारीत भारत १४३२ गुणांसह ५५व्या स्थानी होता.

हेही वाचा - मेस्सी-रोनाल्डोचा पाडाव करत लेवंडोवस्कीने पटकावला सर्वोत्तम फुटबॉलपटूचा पुरस्कार

भारतीय संघाव्यतिरिक्त व्हेनेझुएलानेही दोन स्थानांची कमाई केली असून ते ५५व्या क्रमांकावर पोहोचले आहेत. २१९२ गुणांसह अमेरिका अव्वल स्थानावर आहे. त्यांच्यापाठोपाठ दुसर्‍या क्रमांकावर जर्मनी, तिसर्‍या क्रमांकावर फ्रान्स आणि चौथ्या क्रमांकावर नेदरलँड्स आहे. पहिल्या आठ स्थानांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. माल्टाने रॅकिंगमध्ये सर्वाधिक कमाई केली आहे. त्यांना १६ स्थानांचा फायदा झाला आहे.

पुरुष क्रमवारी -

पुरुषांच्या क्रमवारीत भारतीय पुरुष फुटबॉल संघाची क्रमवारी १०४ अशी आहे. भारतीय संघाकडे सध्या ११८७ गुण आहेत. या क्रमवारीत बेल्जियम प्रथम, फ्रान्स दुसऱ्या ब्राझील तिसऱ्या, उरुग्वे चौथ्या आणि क्रोएशिया संघ पाचव्या स्थानावर आहे.

कोरोना विषाणूच्या साथीमुळे आंतरराष्ट्रीय फुटबॉल मार्चपासून स्थगित आहे. त्यामुळे या परिस्थितीत पहिल्या-५० स्थानांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. फिफाने जाहीर केलेली यंदाची ही अंतिम क्रमवारी यादी आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.