मुंबई - भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्रीला कोरोनाची लागण झाली आहे. याची माहिती खुद्द सुनीलने ट्विट करत दिली.
सुनील छेत्रीला कोरोनाची लागण झाली. यानंतर त्याने ट्विट करत म्हटलं आहे की, 'मी ठणठणीत आहे. मला कोणताच त्रास नाही. मी लवकरच मैदानात परतेन.'
कोरोनाच्या नियमांचे पालन करा, असे आवाहनही सुनीलने ट्विटद्वारे केले आहे. दरम्यान, सुनील काही दिवसांपूर्वी गोव्यात इंडियन सुपर लीग स्पर्धेत खेळला होता. या स्पर्धेत बंगळुरू एफसीचे आव्हान साखळी फेरीतच संपुष्ठात आले होते.
फुटबॉल जगतात, सुनीलच्या आधी पोर्तुगालचा प्रसिद्ध फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोला कोरोनाची बाधा झाली होती. आतापर्यंत अनेक स्टार क्रीडापटूंना कोरोनाची लागण झाली आहे.
हेही वाचा - EXCLUSIVE : उपांत्य सामन्याआधी एफसी गोवा संघाचा फॉरवर्ड जॉर्जशी बातचित
हेही वाचा - आयएसएल : मुंबईचा कर्णधार म्हणतो, ''गोव्याशी दोन हात करण्यास तयार''