ETV Bharat / sports

किंग्स फुटबॉल कप स्पर्धेसाठी भारतीय संघ थायलंडमध्ये दाखल

इगोर स्टिमॅक यांनी प्रशिक्षकपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर त्यांचा हा पहिलाच विदेशी दौरा असणार आहे.

किंग्स फुटबॉल कप स्पर्धेसाठी भारतीय संघ थायलंडमध्ये दाखल
author img

By

Published : Jun 3, 2019, 8:08 PM IST

नवी दिल्ली - थायलंडमध्ये होणाऱ्या किंग्स फुटबॉल कप स्पर्धेसाठी भारतीय फुटबॉल संघ आज (३ जून) ला थायलंडमध्ये दाखल झाला आहे. या स्पर्धेत भारताचा पहिला सामना ५ जूनला कुरसावोविरुद्ध होणार आहे. इगोर स्टिमॅक यांनी प्रशिक्षकपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर त्यांचा हा पहिलाच विदेशी दौरा असणार आहे.

किंग्स फुटबॉल कप स्पर्धेसाठी भारतीय संघ थायलंडमध्ये दाखल
किंग्स फुटबॉल कप स्पर्धेसाठी भारतीय संघ थायलंडमध्ये दाखल

भारतीय संघ ४२ वर्षाच्या दीर्घ प्रतिक्षेनंतर किंग्स फुटबॉल कप स्पर्धेत सहभागी होणार आहे. १९६८ पासून चालू झालेल्या या स्पर्धेत भारताने शेवटचा सामना हा १९७७ साली खेळला होता. या स्पर्धेत भारतासह यजमान थायलंड, व्हिएतनाम आणि कुरसावो देशाचे संघ सहभागी होणार आहेत. या स्पर्धेतील सर्व सामने बुरीराम येथील चांग एरेना फुटबॉल मैदानावर खेळले जाणार आहेत.

भारतीय संघ
भारतीय संघ

फिफाच्या ताज्या जागतिक क्रमवारीत भारताचा फुटबॉल संघ १०१व्या स्थानी आहे. तर थायलंड ११४व्या, व्हिएतनाम ९८व्या तर कुरसावोचा संघ ८२व्या स्थानी विराजमान आहेत.

असा आहे किंग्स फुटबॉल कपसाठी भारतीय संघ

  • गोलरक्षक - गुरप्रीतसिंग संधू, अमरिंदर सिंग आणि कमलजीत सिंग.
  • बचाव फळी - प्रीतम कोताल, राहुल भेके, संदेश झिंगन, आदिल खान, शुभाशीष बोस
  • मधली फळी - उदांता सिंग, जॅकीचंद सिंग, ब्रँडन फर्नांडिस, अनिरुद्ध थापा, रेनियर फर्नांडिस, प्रणाय हलधर, सहल अब्दुल, अमरजीत सिंग, लालरिजुआला छांगटे, मायकेल सूसइराज.
  • आक्रमक फळी - बलवंत सिंग, सुनील छेत्री, फारूख चौधरी व मनवीर सिंग
  • मुख्य कोच - इगोर स्टीमाक

Intro:Body:

sport

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.