नवी दिल्ली - हॉकी इंडियाकडून स्पेनमध्ये 10 जूनपासून सुरु होणाऱ्या 8 नेशन्स अंडर 21 स्पर्धेसाठी 18 सदस्यीय भारतीय पुरुष संघाची घोषणा करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघाच्या नेतृत्वाची धुरा मनदीप मोरकडे देण्यात आली आहे. तर उपकर्णधारपदाची जबाबदारी सुमन बेककडे असेल.
स्पेनमध्ये होणाऱ्या अंडर 21 स्पर्धेत भारतासह यजमान स्पेन, ऑस्ट्रिया, ऑस्ट्रेलिया, नेदरलँड, बेल्जियम, ग्रेट ब्रिटन, आणि न्यूझीलंड हे संघ सहभागी होणार आहे.
स्पेनमधील अंडर 21 स्पर्धेसाठी भारतीय संघ
- गोलकीपर : प्रशांत कुमार चौहान आणि पवन.
- डिफेंडर : मनदीप मोर (कर्णधार), प्रताप लाकड़ा, संजय, आकाशदीप सिंह जूनियर, सुमन बेक (उप कर्णधार), परमप्रीत सिंह.
- मिडफील्डर : यशदीप सिवाच, विष्णु कांत सिंह, रबीचंद्र सिंह मोइरंगथेम, मनिंदर सिंह, विशाल अंतिल.
- फॉरवर्ड : अमनदीप सिंह, राहुल कुमार राजभर, शिवम आनंद, सुदीप चिरमको, प्रबजोत सिंह.