साओ पाउलो - महान फुटबॉलपटू पेले अजूनही आयसीयूमध्ये आहेत. त्याच्या पोटातील ट्यूमर (गाठ) काढण्यासाठी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. साओ फाउलोमध्ये अल्बर्ट आइस्टाइन रुग्णालयात पेले यांच्यावर उपचार सुरू आहेत.
अल्बर्ट आइस्टाइन रुग्णालय प्रशासनाने सांगितलं की, 80 वर्षीय पेले यांच्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी झाली. तरी देखील त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आलं आहे.
पेले बातचित करत आहेत. तसेच त्यांचा रक्तदाब आणि इतर गोष्टी सामान्य आहेत, असे देखील रुग्णालय प्रशासनाने स्पष्ट केले. ब्राझीलचे 3 वेळचे विश्वचॅम्पियन पेले यांनी इन्स्टाग्रामवर सांगितलं की, मला पूर्वीपासून थोडसं आणखी बरं वाटत आहे.
पेले ऑगस्ट महिन्यात रेग्यूलर तपासणीसाठी रुग्णालयात गेले होते. तेव्हा तपासणीत त्यांना कोलोन ट्यूमर झाल्याचे समोर आले होते.
पेले यांना चालण्यास त्रास होत आहे. यामुळे ते वॉकर आणि व्हीलचेयरची मदत घेत आहे. काही दिवसांपूर्वी त्यांच्या किडनीसंदर्भात देखील समस्या उद्भवली होती.
हेही वाचा - IPL 2021: खास चार्टर प्लेनने रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह आणि सूर्यकुमार यादव अबुधाबीत दाखल
हेही वाचा - US Open 2021 : अलेक्झांडर ज्वेरेवचा धुव्वा उडवत नोवाक जोकोव्हिच अंतिम फेरीत