कोलकाता - भारताचा सर्वात जुना फुटबॉल क्लब मोहन बागान इंडियन सुपर लीग (आयएसएल) क्लब एटीकेमध्ये विलीन होऊ शकतो. अहवालानुसार येत्या हंगामात या विलीनीकरणाची शक्यता आहे. एका वेबसाइटच्या वृत्तानुसार, माजी आय-लीग विजेता मोहन बागान आणि दोन वेळा आयएसएल विजेता एटीके यांच्यातील विलीनीकरणाविषयी चर्चा सुरू आहे. आयएसएलच्या आगामी हंगामात दोन्ही संघ एकत्र खेळण्यावर चर्चा करत आहेत.
हेही वाचा - पुजाराने ठोकले ५०वे शतक!.. दिग्गजांच्या यादीत मिळवले स्थान
मोहन बागानचे देबाशिष दत्ता यांनी एका मीडियासंस्थेला सांगितले की, 'मी या निमित्ताने काही बोलू शकत नाही. जर काही घडलं तर आम्ही बाकीच्या मुद्द्यांकरिता आपण औपचारिक घोषणा करू.' एटीकेच्या एका अधिकाऱ्यानेही या विषयावर मौन बाळगले आणि सांगितले की यावेळी त्यांनी या विषयावर भाष्य करणे फार घाईचे होईल.