नवी दिल्ली - क्रीडा मंत्रालयाने शुक्रवारी मणिपूरच्या दिवंगत फुटबॉल खेळाडू मनिटोम्बी सिंग यांच्या कुटुंबाला पाच लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली. मंत्रालयाने शुक्रवारी निवेदन पाठवून यासंदर्भात माहिती दिली.
यावर्षी ऑगस्टमध्ये मॅनिटोम्बी यांचे निधन झाले. ते त्यांच्या कुटुंबातील एकमेव कमवणारे व्यक्ती होते. त्यांच्या पश्चात पत्नी व मुलगा असा परिवार आहे. पंडित दीनदयाळ उपाध्याय राष्ट्रीय कल्याण निधीद्वारे मनिटोम्बीच्या कुटुंबाला पाच लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे.
फुटबॉलमध्ये मॅनिटोम्बीने महत्त्वपूर्ण योगदान
भारतीय फुटबॉलमध्ये मॅनिटोम्बीने महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. ते मणिपूरचे प्रशिक्षकही राहिले आहेत. त्यांच्या मृत्यूमुळे खेळाचे मोठे नुकसान झाले. त्यांच्या निधनानंतर कुटुंब आर्थिकदृष्ट्या संकटात असल्याचे आम्हाला समजल्यानंतर, त्यांना पाठिंबा देणे आमचे कर्तव्य होते. सध्याचे आणि माजी खेळाडू तसेच प्रशिक्षकांना पाठिंबा देणे, प्रशासक, समर्थक कर्मचारी ज्यांनी आपले जीवन खेळासाठी समर्पित केले त्यांना मदत करण्याला सरकारचे प्राधान्य आहे, असे क्रीडामंत्री किरण रिजिजू म्हणाले.