मुंबई - 'फिफा'ची २०२२ साली होणारी फुटबॉल विश्वकरंडक स्पर्धा कतारमध्ये होणार आहे. स्पर्धेच्या आयोजन समितील वरिष्ठ सदस्याने १९८३ आणि २०११ साली क्रिकेट विश्वकरंडक जिंकलेल्या भारतीय संघाला फुटबॉल विश्वकरंडक स्पर्धा बघण्यासाठी निमंत्रण दिले आहे.
नासीर अल खतेर म्हणाले, २०२२ साली होणारा फुटबॉल विश्वकरंडक आपल्यासाठी एका उत्सवाप्रमाणे असणार आहे. भारतात क्रिकेट हा एवढा मोठा खेळ आहे, याचा अंदाज मला नव्हता. १९८३ साली विंडीज हरवून विश्वकरंडक जिंकलेला संघ आणि २०११ सालीच्या विश्वविजेत्या संघातील काही खेळाडू येथे उपस्थित आहेत. मी या सर्वांना फिफा विश्वकरंडक पाहण्याचे आमंत्रण देत आहे.
भारतात क्रिकेट हा सर्वात मोठा आणि लोकप्रिय खेळ आहे. कतार येथे होणाऱ्या फुटबॉल विश्वकरंडकाचे मुख्य कार्यकारी अधिकारी नासीर अल खतेर यांनी या गोष्टीला लक्षात घेऊन क्रिकेट विश्वकरंडक जिंकणाऱया भारतीय संघाला निमंत्रण दिले आहे. भारताने १९८३ साली कपिल देवच्या नेतृत्वात तर, २०११ साली महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात विश्वकरंडक जिंकला होता.