कोझिकोड (केरळ) - कोरोनामुळे माजी फुटबॉलपटू हम्जा कोया यांचे निधन झाले. ते ६१ वर्षांचे होते. श्वसनाची समस्या होत असल्याने त्यांना मल्लापुरम येथील मंजेरी वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
हम्जा कोया यांनी महाराष्ट्राच्या राज्यस्तरीय संघाचे प्रतिनिधित्व केले होते. शिवाय त्यांनी संतोष चषक स्पर्धेतही महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले होते. ते मोहन बगान आणि मोहम्मदीन स्पोर्टींग या क्लबकडूनही खेळले आहेत. ते आपल्या कुटुंबीयांसह काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातून केरळमध्ये परतले होते.
कोया यांच्यामध्ये कोरोनाची लक्षण दिसून आली. तेव्हा त्यांना मल्लापुरम येथील मंजेरी वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची चाचणी झाली, यात ते पॉझिटिव्ह आढळले. यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू होते. दोन दिवसांपासून त्यांना श्वास घेताना त्रास होत होता. यामुळे त्यांना व्हेटिंलेटरवर ठेवण्यात आले होते. आज सकाळी त्यांची अचानक प्रकृती ढासळली आणि यातच त्यांचे निधन झाले.
हम्जा कोया यांच्या घरातील 5 सदस्यांनाही कोरोना झाला असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, हम्जा यांच्या मृत्यूनंतर केरळमधील कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांचा आकडा 15 इतका झाला आहे.
हेही वाचा - कोरोना महामारीत इंग्लंड दौरा नको रे बाबा, विंडीजच्या तीन खेळाडूंनी घेतली माघार
हेही वाचा - लॉकडाउन काळातही विराटने कमावले कोट्यावधी रुपये, कसे ते जाणून घ्या...