ETV Bharat / sports

कोरोनामुळे युरो फुटबॉल चषक रद्द, लवकरच घोषणेची शक्यता

author img

By

Published : Mar 17, 2020, 11:30 PM IST

कोरोना विषाणूच्या फैलावामुळे मानाची समजली जाणारी युरो चषक फुटबॉल स्पर्धाच्या यंदाच्या वर्षी न खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही स्पर्धा २०२१ मध्ये होऊ शकते, असे म्हटले जात आहे.

Euro 2020 soccer tournament postponed until 2021 due to coronavirus pandemic
कोरोनामुळे युरो फुटबॉल चषक रद्द, लवकरच घोषणेची शक्यता

मुंबई - कोरोना विषाणूच्या फैलावामुळे मानाची समजली जाणारी युरो चषक फुटबॉल स्पर्धाच्या यंदाच्या वर्षी न खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही स्पर्धा २०२१ मध्ये होऊ शकते, असे म्हटले जात आहे. पण याबाबत आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाने खुलासा केलेला नाही. पण स्वीडनच्या फुटबॉल संघटनेने मात्र युरो चषक पुढे ढकलणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

कोरोनाच्या धोक्यामुळे जगभरात अनेक स्पर्धा रद्द करण्यात येत आहेत. स्पॅनिश फुटबॉल क्लब व्हॅलेंसियाने आपल्या क्लबमधील ३५ टक्के खेळाडू आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचं म्हटलं आहे. तसेच आज (मंगळवार) सकाळी स्पेनमधील अ‌ॅटलेटिको पोर्ताडा अल्टा क्लबचा प्रशिक्षक फ्रान्सिस्को गार्सिया याचा कोरोना विषाणूमुळे वयाच्या २१ व्या वर्षी मृत्यू झाला आहे. या सर्व घटनेच्या पार्श्वभूमीवर युरो चषक स्पर्धा रद्द करण्याचा विचार केला जात असून याबाबतची अधिकृत घोषणा लवकरच करण्यात येणार असल्याचे समजते.

दरम्यान, कोरोनाच्या धोक्यामुळे युरोपमधील सीरी ए, इंग्लिश प्रीमिअर लीग, ला लिगा, बुंदेसलिगा आदी फुटबॉल लीग रद्द करण्यात आल्या आहेत. यात जर युरो चषक जर रद्द केली तर हा फुटबॉल जगताला मोठा धक्का असेल.

स्पेनमध्ये मंगळवारी सकाळपर्यंत ९ हजार ९४२ कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. तर कोरोनामुळे स्पेनमध्ये आतापर्यंत ३४२ लोकांचा मृत्यू झाला आहे.

हेही वाचा - क्रीडा क्षेत्रात कोरोनाचा पहिला बळी, २१ वर्षीय फुटबॉल प्रशिक्षकाचा मृत्यू

हेही वाचा - धक्कादायक..! स्पॅनिश फुटबॉल क्लबच्या ३५% खेळाडूंना कोरोनाची लागण

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.