नागपूर Sachin Tendulkar Visit To Tadoba : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प आणि जंगलातील वाघ आणि प्राण्यांच्या कायम प्रेमात असलेल्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची पावलं आज पुन्हा ताडोबा जंगलाच्या दिशेनं वळली आहेत. ताडोबा जंगल सफरीला आजपासून सुरुवात झाली आहे. ही संधी साधून सचिन तेंडुलकर आणि त्याची पत्नी अंजली तेंडुलकर जंगल सराफीचा आनंद घेण्यासाठी नागपूरला दाखल झाले. त्यानंतर सचिन तेंडुलकर गाडी चालवत थेट चंद्रपूरच्या दिशेनं रवाना झाले आहेत. विशेष म्हणजे सचिन तेंडुलकर उद्या केंद्रीय रस्ते आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या घरी खास नागपुरी पोह्यांवर ताव मारणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
सचिन तेंडुलकर गाडी चालवत पोहोचला ताडोबात : आजपासून ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प पर्यटकांसाठी पुन्हा सुरू होत आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प पर्यटकांसाठी पुन्हा सुरू होत असल्यानं पर्यटकांची पावलं ताडोबाकडं वळली आहेत. सुप्रसिद्ध क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर हा ताडोबा जंगल सफारीचा खास चाहता आहे. दरवर्षी सचिन तेंडुलकर ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात सहकुटुंब पोहोचतो. आज ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प विश्रांतीच्या काळानंतर पुन्हा सुरू झाला. ताडोबा सुरू झाल्याच्या पहिल्याच दिवशी सचिन तेंडुलकर त्याची पत्नी अंजली तेंडुलकरसह तोडोबात पोहोचला आहे. सचिन तेंडुलकर स्वत: गाडी चालवत विमानतळावरुन ताडोबाकडं निघाला.
ताडोबा जंगल सफारीला आजपासून सुरुवात : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प 1 जुलै ते 30 सप्टेंबर या कालाधित पर्यटनासाठी बंद असते. पावसाळ्याचा कालाधित ताडोबा जंगल सफारी बंद ठेवण्यात येते. त्यानंतर 1 ऑक्टोबर ते 30 जून या कालाधित हजारो पर्यटक ताडोबाला भेट देतात. आजपासून ताडोबा जंगल सफारी पुन्हा सुरू झाली आहे. त्यामुळे पर्यटकांची पावलं पहिल्याच दिवशी ताडोबाकडं वळली आहेत. आज ताडोबाला भेट देणाऱ्या पर्यटकांमध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यानंही भेट दिली आहे.
हेही वाचा :